Indian Railways: देशातील कोट्यावधी रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी ऐकून तुम्हाला आनंद होईल. भारतीय रेल्वेने भाड्यात २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसी चेअर कार आणि सर्व ट्रेनच्या एक्झिक्युटिव्ह क्लासच्या भाड्यावर कपात लागू होणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. पीटीआयने यासंदर्भात माहिती दिली आहे. सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारतचे भाडे कमी करण्याची सूचनाही रेल्वेकडून करण्यात आली आहे.


ज्या गाड्यांमध्ये गेल्या ३० दिवसांत ५० टक्क्यांपेक्षा कमी जागा भरल्या गेल्या, त्या गाड्यांच्या प्रवासी भाड्यात कपात करावी असे आदेश रेल्वे बोर्डाकडून देण्यात आले आहेत.