नवी  दिल्ली : रसगुल्ला... ! एक असा गोड पदार्थ ज्याचं नाव घेताच तोंडाला पाणी सुटतं. साखरेच्या पाकात डुंबलेला हा पांढरा गोळा, जेव्हा तोंडात जातो तेव्हा आनंदानं डोळेच बंद होतात. रसगुल्ला खाण्याचं हे वर्णन केल्यानंतर तुमच्याही डोळ्यांसमोर हा पदार्थच आला असेल. याच पदार्थानं एक गोंधळ घातला आहे. (Indian Railways faced problem because of rasgulla read details )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा गोंधळ इतका मोठा, की यामुळे थेट भारतीय रेल्वे (Indian Railways)ही अडचणीत आली. परिणामी हा गोड पदार्थ रेल्वेसाठी मात्र कटू अनुभव देणारा ठरला. 


बिहारच्या लखीसराय येथील बरहिया रेल्वे स्थानकावर 10 रेल्वे गाड्या थांबवण्याची मागणी करत स्थानिकांनी जवळपास 40 तासांपर्यंत विरोध सुरुच ठेवला. रेल्वे स्थानकांवरच विरोधकांनी तंबू ठोकल्यामुळं रेल्वेचं वेळापत्रकच कोलमडलं. 


परिणामी हावड़ा-दिल्ली रेल्वेमार्गावर (Howrah-Delhi Rail Line) साधारण बाराहून अधिक रेल्वे गाड्या 24 तासांसाठी रद्द करण्यात आल्या तर, 100 रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. 


लसीखराय जिल्हाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मोठ्या संख्येनं नागरिक रेल्वे रुळांवर आल्यामुळं ही परिस्थिती उदभवली. बऱ्याच लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना बहरियामध्ये थांबवण्याचा कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाही, ज्यामुळं हा विरोध करण्यात आला आहे. 


रसगुल्ला आणि या प्रकरणाचं नेमकं नातं काय ? 
तुम्हाला ठाऊक नसावं, पण बहरिया येथे मिळणारा रसगुल्ला संपूर्ण देशात प्रचंड प्रसिद्ध आहे. या पदार्थाच्या मागणीमुळं इथून बऱ्याच ठिकाणी गोड पदार्थांची निर्यात केली जाते. काहीजण तर बहरिया येथे खास रसगुल्ले खरेदी करण्यासाठी येतात. या भागात एका रसगुल्ल्याचीच 200 दुकानं आहेत. 


सदर भागात रेल्वेला अडथळा केल्यामुळं येथील व्यवसायावरही परिणाम झाले. कोविड काळातही बहरिया येथे रेल्वे गाड्या न थांबवल्याचे परिणाम रसगुल्ल्याच्या व्यवसायावर झाले होते. ज्यामुळंच स्थानिक आणि मिठाई व्यापारी संतप्त प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. 


रस्ते मार्गानं रसगुल्ले अपेक्षित ठिकाणी न्यायचे झाल्यास त्यांचा प्रवास खर्च तिप्पट वाढला आहे. खासगी वाहनाची सोय करावी, तरीही खर्च आलाच. थोडक्यात व्यापाऱ्यांनाच सर्व बुर्दंड. ज्यामुळं एकिकडे पैसे कमवण्याचे दिवस जोमात असतानाच दुसरीकजडे मात्र मिठाई बनवणाऱ्यांना या सर्व अडचणींचा सामना करावा लागत आहे.