Indian Railways News: बऱ्याचदा लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी विमानाचं तिकीट (Railway ticket booking) परवडतंच असं नाही. अशा परिस्थितीत देशातील बहुतांश नागरिकांची पसंती असते ती म्हणजे भारतीय रेल्वेला. आशिया खंडातील सर्वात मोठं Network असल्या कारणानं भारतीय रेल्वे विभाग जगभरातील दळवळणाच्या सोयीसुविधांमध्ये कायमच चर्चेचा विषय ठरतो. आतासुद्धा रेल्वे विभागाकडून असा निर्णय घेण्यात आला आहे ज्याचा फायदा प्रवाशांना घेणं अगदी सहज शक्य असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वेकडून (Railways) बऱ्याच अशा सुविधा पुरवण्यात येतात ज्याविषयी प्रवाशांना फार कमी माहिती असते. यातलीच एक सुविधा म्हणजे, रेल्वेतील खाण्यापिण्याची (Railway meal). तुम्ही जर एखादा लांब पल्ल्याचा प्रवास रेल्वेनं करत आहात तर त्यादरम्यान तुम्हाला मोफत खाणं आणि शीतपेय (Cold drinks) देण्यात येणार आहे. पण हे तेव्हेच शक्य असेल जेव्हा तुमची ट्रेन निर्धारित वेळेपेक्षा उशिरानं असेल. IRCTC च्या नियमावलीनुसार या परिस्थितीत प्रवाशांना नाश्ता आणि हलका आहार देण्याची तरतुद आहे. 


VIDEO | भयंकर! सुरत रेल्वे स्टेनशवर प्रवाशांची तुफान गर्दी


 


IRCTC च्या नियमानुसार तुमची ट्रेन 2 तास किंवा त्याहून अधिक वेळ उशिरानं धावत असल्यास Free Meal देण्यात येतं. ही सुविधा एक्स्प्रेस ट्रेनमध्ये (Express Trains) देण्यात येते. यामध्ये (Shatabdi) शताब्दी, (Rajdhani) राजधानी आणि (Duronto Express) दूरंतों एक्सप्रेसचा समावेश आहे. 


रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या या मिलबॉक्समध्ये चहा / कॉफी, बिस्कीट मिळतात. सायंकाळच्या वेळी  (tea/ coffee) चहा / कॉफी, (Bread) ब्रे़ड (ब्राऊन/ व्हाईट), एक बचर चिपलेट देण्यात येतं. दुपारच्या जेवणात रेल्वेतर्फे प्रवाशांना चपाती, डाळ आणि भाजी देण्यात येते. या सर्व गोष्टी अगदी मोफत असतात. त्यामुळं आता प्रवासाची सुरुवात उशिरा झाली तरी हा प्रवास सुखकर होणार हे मात्र नक्की.