Railway Ticket Booking : (Indian Railway) रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवासांचा आकडा आता लक्षणीय प्रमाणात वाढला आहे. जगातील काही मोठ्या रेल्वे जाळ्यांपैकी एक म्हणून गणल्या जाणाऱ्या भारतीय रेल्वेमुळं देशातील बहुतांश भाग रेल्वे मार्गानं जोडला गेला आहे. दूरवर असणारी खेडीसुद्धा या रेल्वेमुळं जगाच्या नजरेत आली आहेत. अशी ही भारतीय रेल्वे देशातील दळणवळणाच्या साधनांमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका निभावते. याच रेल्वेसाठी आता भारत सरकारनं काही महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वेतील वाढती गर्दी पाहता शासनानं पुढील पाच वर्षांसाठीचा आराखडा तयार केला असून, या पाच वर्षांमध्ये देशात 3 हजार नव्या रेल्वे सुरु करण्याच्या योजनेवर कामही सुरु करण्यात आलं आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली. भारत सरकार रेल्वेच्या प्रवासी क्षमतेला आता 800 कोटींवरून 1 हजार कोटींपर्यंत नेऊ इच्छित आहे. यासाठीच पुढील पाच वर्षांमध्ये 3 हजार नव्या ट्रेन सुरु करण्याच्या योजनेवर काम सुरु असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. रेल्वेच्या या निर्णयाचा फायदा प्रवाशांना होणार आहे. कारण, रेल्वे गाड्यांची उपलब्धता पाहता येत्या काळात तिकीट बुक करताच ते कन्फर्म होऊ शकतं. थोडक्यात ही प्रतीक्षा टळली. 


कसा असेल हा मेगा प्लॅन? 


रेल्वे विभागाशी संलग्न सूत्रांच्या माहितीनुसारस, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी लागणारा वेळ कमी करणं अतिशय गरजेचं आहे. कारण, अशा प्रसंगी निर्धारित स्थानकांवर थांबण्याव्यतिरिक्त अनेक वळणांवर रेल्वेचा वेग कम करावा लागतो. हीच गरज पाहता रेल्वेसाठी दर वर्षी जवळपास 5000 किमीचे रुळ तयार करुन रेल्वेचं जाळं वाढवण्याची गरज वैष्णव यांनी बोलून दाखवली. 


सध्या 1 हजारहून अधिक फ्लायओव्हर आणि अंडरपासना मंजुरी मिळाली असून, अनेक ठिकाणांवर याची कामंही सुरु करण्यात आल्याचं वैष्णव यांनी स्पष्ट केलं. 


हेसुद्धा वाचा : एकदोन नव्हे, मुंबईत तब्बल 13 दिवस पाणीकपात; तारखा आताच पाहून घ्या 


रेल्वेच्या सद्यस्थितीवर नजर टाकल्यास, आताच्या घडीला तब्बल 69 हजार कोच उपलब्ध असून दरवर्षी किमान पाच हजार कोचची निर्मिती रेल्वे विभाग करत आगे. प्रयत्नांची ही साखळी पाहता दर वर्षी किमान 200 ते 250 नव्या रेल्वेगाड्या सेवेत दाखल होऊ शकतात. ही एकंदर आकडेवारी आणि रेल्वे विभागाचा मेगा प्लॅन पाहता येत्या काळात भारतीय रेल्वेचा विकास करण्याच्या कामाला वेग मिळाल्याचच स्पष्ट होत आहे.