Indian Railway News In Marathi : भारतीय रेल्वे ही जगातील चौथ्या क्रमाकांचे आणि आशियातील दुसरे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. रेल्वेच जाळे सर्वदूर पसरलेले आहे. अत्यंत सोपो आणि सोयीस्कर तसेस सर्वांना परवडणारा प्रवास म्हणजे रेल्वेचा प्रवास. देशभरातील दररोज कोट्यावधी प्रवासी रेल्वेने ये-जा करत असतात. भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी विविध सुविधा दिल्या जातात. त्यातच आता भारतीय रेल्वेने 1 एप्रिलपासून म्हणजेच आजपासून रेल्वेच्या नियमांत मोठा बदल केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी 1 एप्रिलपासून आपल्या नियमात मोठा बदल केला आहे. रेल्वेच्या या नव्या नियमामुळे रेल्वेने विना तिकीट प्रवास करणे प्रवाशांना महागात पडू शकते. जर विना तिकीट रेल्वेमध्ये प्रवास करताना पकडले गेलात तर आता ऑनलाईन दंड भरावा लागू शकतो. भारतीय रेल्वेने हा दंड भरण्यासाठी  डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत फुकट्या प्रवाशांकडून दंड आकरण्याची पद्धत सुरु केली आहे.  भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी 1 एप्रिलपासून आपल्या नियमात मोठा बदल रेल्वे करणार आहे. या नियमामुळे रेल्वेने विनातिकीट प्रवास करणे प्रवाशांना महागात पडू शकते. त्यामुळे प्रवाशांकडून आता क्यूआर कोड स्कॅन करुन दंड वसूल केला जाणार आहे. यासाठी रेल्वे तिकीट तपासणीसांना हँडहोल्ड टर्मिनल मशीन प्रदान करण्यात येणार आहे. प्रवासादरम्यान विनातिकीट पकडले गेल्यास आणि कॅश नसेल तर अशावेळी डिजीटल पेमेंट करु शकतो आणि तुरुंगात जाण्यापासून वाचू शकतो. 


तसेच रेल्वे तिकीट घरांसमोरील प्रवाशांची गर्दी पाहता महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तिकीट खरेदी करताना पेमेंटशी संबंधित समस्या अनेकांना उद्भवतात. आता प्रवाशांना रेल्वे स्थानकांवरील तिकीट काउंटवरुन तिकीट खरेदी करताना क्यूआर कोड स्कॅन करण्याचा पर्याय मिळणार आहे. यासाठी गुगल पे आणि फोन पे सारख्या UPI अॅप्सद्वारे प्रवासी त्यांच्या सोयीनुसार पेमेंट करु शकणार आहेत.