खूशखबर! आता ट्रेनचं तिकीट नसलं तरी TC थांबवणार नाही! कसं ते जाणून घ्या
Indian Railways Update : रेल्वेकडून अनेक प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात. तुम्हालाही त्यांच्याबद्दल माहिती नसेल तर आज जाणून घ्या कारण, आज आम्ही तुम्हाला अशाच एका खास सुविधेबद्दल सांगणार आहोत... ज्यामध्ये तुम्ही विना तिकीट ट्रेनमध्ये चढू शकता...
Indian Railways : अनेकवेळा प्रवाशांना अचानक प्रवास करावा लागतो. त्याचदरम्यान जर तुम्हीही ट्रेनने (train) प्रवास करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला घाईघाईत कन्फर्म ट्रेन तिकीट मिळाले नसेल, तर तुम्ही विना तिकीट (Without ticket) ट्रेनमध्ये चढू शकता. रेल्वेच्या या खास नियमाबद्दल जाणून घ्या. (indian railways news you can travel without ticket in train platform ticket )
भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र बहुतांश प्रवाशांना रेल्वेच्या नेहमीच्या वापरातील नियमांबद्दल (Indian Railway rules) पुरेशी माहिती नसते. अनेकवेळा प्रवाशांना अचानक प्रवास करावा लागतो. तुमच्या बाबतीतही असे घडले असेल तर त्याबद्दल बारकाईने जाणून घेतले पाहिजे.
जर तुमच्याकडे आरक्षण (ticket reservation) नसेल, तर आता तुम्ही फक्त प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढू शकता आणि त्यानंतर तुम्हाला TTE शी संपर्क साधावा लागेल. तुम्हाला तिकीट तपासनीसकडे जावे लागेल आणि तेथे जाऊन तुम्ही तुमचे तिकीट काढू शकता. तुम्हाला तुमची सर्व माहिती तिकीट तपासकाला सांगावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या नियोजित स्टेशनपर्यतचे तिकीट मिळणार.
वाचा : Asia Cup 2022: MS Dhoni मुळे पाकिस्तानचा पराभव, कसं ते जाणून घ्या...
आरक्षित सीट नसल्यास
ट्रेनमध्ये सीटच्या (railway seat) कमतरतेमुळे तुम्हाला आरक्षित सीट (train seat) मिळण्यास त्रास होऊ शकतो. परंतु तिकीट तपासनीस तुम्हाला प्रवास करण्यापासून रोखू शकत नाही. प्रवाशांना तिकीटाच्या एकूण भाड्यासह 250 रुपये दंड आकारून तिकीट काढावे लागेल. प्लॅटफॉर्म तिकीट धारण केल्यानंतर, प्रवासी ट्रेनमध्ये चढण्यास पात्र ठरतो. प्लॅटफॉर्म तिकीट (platform ticket) ज्या स्थानकावरून घेतले आहे त्याच स्थानकावरून प्रवाशाला भाडे द्यावे लागेल हे लक्षात घ्या.
तुमची ट्रेन चुकली तर
याशिवाय जर तुमची ट्रेन कोणत्याही कारणास्तव चुकली तर तिकीट तपासनीस पुढील 2 स्टेशनपर्यंत तुमची सीट कोणालाही देऊ शकत नाही. याशिवाय जर तुमची ट्रेन कोणत्याही कारणास्तव चुकली तर तिकीट तपासनीस पुढील 2 स्टेशनपर्यंत तुमची सीट कोणालाही देऊ शकत नाही.
रेल्वे बोर्डाने माहिती दिली
रेल्वे बोर्डाच्या (Railway board) म्हणण्यानुसार, अधिकाऱ्यांनी पॉईंट ऑफ सेलिंगमध्ये म्हणजेच POS मशीनमध्ये 2G सिम बसवले आहेत, त्यामुळे दुर्गम भागात नेटवर्कची समस्या आहे, परंतु आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. या मशीन्ससाठी रेल्वेकडून 4G सिमची सुविधा सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे तुम्ही सहज पेमेंट करू शकता.