Indian Railways: आता ट्रेनमध्ये मिळेल कन्फर्म सीट, रेल्वेने सांगितली `ही` सोपी पद्धत!
Indian Railways Latest News : रेल्वेकडून अनेक विशेष गाड्याही चालवल्या जातात, परंतू अनेकदा कन्फर्म तिकीट मिळू शकत नाही. अशातच रेल्वेने भन्नाट उपाय सांगितला आहे.
Indian Railways Tatkal Ticket : सणासुदीच्या काळात (Festive Season) ट्रेनमध्ये तिकीट मिळवणं ही एक अवघड कसरत आहे. त्यामुळे प्रवास करताना जनरल डब्यात किंवा उभा राहून अनेकदा जावं लागतं. मात्र, रेल्वेच्या अशा काही सुविधा आहेत, ज्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. ज्यामध्ये तुम्हाला तत्काळ तिकीट बुकिंग (Tatkal Ticket Booking) देखील मिळेल.
अनेक वेळा तत्काळच्या झटपटात तिकीट बुक करावं लागतं, ज्यामध्ये तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता खूपच कमी असते. प्रवाशांच्या मोठ्या संख्येमुळे तत्काळ बुकिंगमध्ये जागा उपलब्ध होत नाहीत, त्यानंतर लोक एजंटशी संपर्क देखील करतात. त्यामुळे अनेकदा तिकीट भेटून देखील जातं, मात्र, त्य़ासाठी तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागतात.
IRCTC मास्टर लिस्ट फीचर
IRCTC च्या या फीचरद्वारे तुम्ही काही मिनिटांत कन्फर्म तत्काळ तिकिट मिळवू शकता. IRCTC च्या मास्टर लिस्ट फीचरद्वारे तुमचं काम सोपं होऊन जाईल. ज्याच्या मदतीने तिकीट बुक करताना लागणारा वेळही वाचणार आहे. यासोबतच कन्फर्म सीट मिळण्याची शक्यता देखील असते.
IRCTC च्या मास्टर लिस्ट फीचरद्वारे तुम्ही प्रवाशांची नावं आधीच भरू शकता. तत्काळ तिकीट बुक करताना तुम्हाला ते पुन्हा टाइप करण्याऐवजी फक्त नाव निवडावं लागेल. यामुळे तुमचा तपशील भरण्यात बराच वेळ वाचतो. त्यामुळे तत्काळ तिकीट मिळण्याची शक्यताही वाढते.
सर्वात आधी तुम्हाला IRCTC चं मोबाईल अॅप किंवा वेबसाइट उघडावी लागेल. त्यात तुमचं खात्यात लॉग इन असणं आवश्यक आहे. येथे दिलेल्या पर्यायांपैकी मास्टर लिस्ट वैशिष्ट्य हा पर्याय निवडा, त्यामुळे तुम्हाला तिकीट काढताना फायदा होतो. ज्या प्रवाशांसाठी बुकिंग करायचं आहे त्या सर्व प्रवाशांची माहिती भरावी लागते.
आणखी वाचा - IRCTC Indian Railway: भारतीय रेल्वेत नोकरीची मोठी संधी
तत्काळ तिकीट बुकिंग सुरू झाल्यावर तुम्ही मास्टर लिस्टमधून प्रवाशांचे तपशील निवडू शकता. पेमेंट करताना तुम्ही UPI पर्याय निवडला तर भरपूर वेळ वाचतो आणि तिकीट देखील मिळतं. त्यामुळे डिजीटल युगात UPI चा पर्याय फायदेशीर ठरतो.
दरम्यान, तुम्ही UPI पेमेंट पर्याय निवडला तर तुम्हाला सहज तिकीट मिळू शकतं. ज्यामुळे तिकीट मिळण्याची शक्यता वाढते. मात्र, काहीवेळा व्यस्त मार्गांवर कन्फर्म तिकीट बुक (Confirm ticket) करण्यात अडचण येते. त्यामुळे तुमची प्रक्रिया वेगवान असणे गरजेचं आहे.