Indian Railways Latest News: देशातील एका कोपऱ्याला दुसऱ्या कोपऱ्याशी जोडणाऱ्या भारतीय रेल्वेनं दिवसागणित आपल्या कक्षा रुंदावल्या आहेत. देशांतर्गत प्रवास आणखी सोपा केला आहे. अशा या रेल्वे विभागाकडून पुन्हा एकदा प्रवाशांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (Gudi Padwa 2023) गुढी पाडव्याच्या दिवशी या निर्णयाची माहिती मिळणं म्हणजे जणू नागरिकांना रेल्वेनं दिलेली खास भेटच आहे. (Indian Railways passenger ac 3 coach fare details in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही रेल्वेनं थर्ड एसीनं प्रवास करता का? ही बातमी खास तुमच्यासाठी. कारण, रेल्वेनं घेतलेल्या एका निर्णयानंतर एसी थ्री इकोनॉमी कोचनं प्रवास करणं आणखी सोपं झालं आहे. अधिकृत परिपत्रकातून मिळालेल्या माहितीनुसार एसी कोचच्या दरांबाबत जुनी नियमावली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 22 मार्चपासून हा नियम लागू होत आहे.


कमी पैशांत करा रेल्वे प्रवास


22 मार्चपासून तुम्ही थर्ड एसी (AC 3) इकोनॉमीनं प्रवास करत आहात, तर तुम्हाला थर्ड एसीच्या तुलनेत कमी पैसे द्यावे लागणार आहेत. आधीच तिकीट बुकींग केलेल्या प्रवाशांनाही या सुविधेचा फायदा मिळणार आहे. ऑनलाईन किंवा तिकीट खिडकीवरून तिकीट घेतलेल्या प्रवाशांना पैसे परत केले जाणार आहेत.


हेसुद्धा वाचा : गुढी पाडवा शोभायात्रांवर पावसाचे ढग; घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा हवामानाची बातमी


21 मार्च रोजी रेल्वेकडून या निर्णयाबाबतचं परिपत्रक जारी करण्यात आलं. ज्यामधून पुन्हा एकदा जुनी व्यवस्था अंमलात आणली जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. माहितीसाठी, AC 3 कोचमध्ये 72 आसनं असतात तर, एसी इकोनॉमी कोचमध्ये 80 बर्थ असतात. याच कारणास्तव एसी 3 कोचच्या तुलनेत एसी3 इकोनॉमी कोचची आसनं लहान असतात.


रेल्वे विभागानं का केली एसी 3 इकोनॉमी कोचची सुरुवात?


प्रवाशांनाच प्राधान्य स्थानी ठेवत रेल्वेकडून एसी 3 इकोनॉमी कोचची सुरुवात करण्यात आली. यामागं एसीनं प्रवास करायचा तर आहे, पण प्रवास भाडं मात्र खिशाला परवडत नाही ही नागरिकांपुढे असणारी समस्या मुख्य कारण ठरली.