Train Arrives 9 Hours Late Passanger Dance: भारतात लाखो प्रवासी ट्रेनने प्रवास (Indian Railway Travel) करतात. सर्वात सुरक्षित आणि जलद प्रवास म्हणून याकडे पाहिलं जातं. मात्र कधी कधी ट्रेननं प्रवास करणं डोकेदुखी ठरतं. अनेकदा लेटलतिफीमुळे प्रवासी तक्रारी करत असतात. अनेकदा ट्रेन उशिरा आल्याने प्लॅटफॉर्मवरच दिवस काढावा लागतो. अशीच एक घटना समोर आली आहे. हिवाळ्याच्या हंगाम सुरु असून दाट धुक्यामुळे ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलं आहे. व्हायरल व्हिडीओ पोस्ट करताना लिहिलं आहे की, पॅसेंजर ट्रेन 9 तास उशिराने आल्याने प्रवाशांनी जल्लोष केला. हार्दिक बोंथु नावाच्या ट्विटर यूजर्सने हा व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती दिली आहे. 


ट्रेन आल्याने प्रवाशांनी व्यक्त केला आनंद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवासी आनंद करत असल्याचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना लिहिलं आहे की, 'आमच्या ट्रेनला 9 तास उशीर झाला. ट्रेन आल्यानंतर लोकांनी असा जल्लोष केला.' व्हिडीओमध्ये प्रवासी प्लॅटफॉर्मवर उभे असून ट्रेनच्या आगमनाची अपेक्षेने वाट पाहात आहेत. 9 तासानंतर ट्रेन येताच प्रवाशांनी जल्लोष केला. हा व्हिडीओ ट्विटरवर वेगाने व्हायरल होत आहे. 35 सेकंदाचा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. 27 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 11 वाजून 6 मिनिटांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 



बातमी वाचा- Desi Jugaad: घरगुती सिलिंडरच्या माध्यमातून कपड्यांना कडक इस्त्री, देसी जुगाडचा Video Viral


सोशल मीडियावर लोकांनी दिल्या अशा प्रतिक्रिया


सोशल मीडियावर युजर्संनी प्लॅटफॉर्मवर ट्रेनची शांततेने वाट पाहणाऱ्या प्रवाशांच्या संयमाचे कौतुक केले आहे. एका यूजरने प्रतिक्रिया दिली आहे की, 'ट्रेनला इतके तास उशीर होत असताना लोकांनी संयम राखला, ही मोठी गोष्ट आहे.' दुसऱ्या युजर्सने आपला अनुभव सांगितला की, 'आम्हाला अगोदरच माहीत होते, आम्ही हॉटेलमधून उशिरा निघालो, तरीही ट्रेन लेट होती.' आणखी एका यूजरने लिहिले आहे की, 'हे या देशाचे सौंदर्य आहे.'