मुंबई : Indian Railway: भारतीय रेल्वेने प्रवाशांना मोठी बातमी दिली आहे. आता ट्रेनमध्ये आरक्षणादरम्यान प्रवाशांना कन्फर्म सीट मिळणार आहे. (Railway reservation ticket) उन्हाळ्याच्या सुट्या लक्षात घेता रेल्वेने 72 गाड्यांसाठी हा मोठा निर्णय घेतला आहे.


उन्हाळी सुट्टी आणि सण लक्षात घेऊन निर्णय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि सणांमध्ये रेल्वेचे तिकीट बुक करताना बहुतेक वेळा सीटचे आरक्षण आधिच संपलेले असते. अशा परिस्थितीत तिकीट बुकिंग दरम्यान लोकांना जागा मिळत नाही. यासोबतच या काळात तात्काळ तिकीट बुक करणे अवघड होऊन बसते, काउंटर उघडताच काही मिनिटांतच जागा बुक होतात. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने अनेक गाड्यांमधील डब्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.


रेल्वेच्या या निर्णयामुळे रेल्वे तिकीट बुक करताना सीट कन्फर्म होण्याची शक्यता लक्षणीय वाढणार आहे. हे पाहता, उत्तर पश्चिम रेल्वेने 36 जोड्यांमध्ये म्हणजेच एकूण 72 गाड्यांमध्ये 81 डबे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.


या गाड्यांचे डबे वाढवण्यात येणार  


या संदर्भात, 1 मे ते 1 जून 2022 या कालावधीत रोहिल्ला-जोधपूर-दिल्ली सराय रोहिल्ला ट्रेनमध्ये 2 थर्ड एसी आणि 2 सेकंड स्लीपर क्लास कोचच्या संख्येत तात्पुरती वाढ करण्यात आली आहे. जोधपूर-वांद्रे टर्मिनस-जोधपूर ट्रेनमध्ये 4 मे ते 3 जून 2022 या कालावधीत डब्यांची संख्या तात्पुरती वाढवली जात आहे. यामध्ये 2 थर्ड एसी आणि 2 सेकंड स्लीपर क्लास कोच वाढवण्यात येणार आहेत. बिकानेर-दिल्ली सराय रोहिला-बिकानेर या ट्रेनच्या दोन्ही फेऱ्यांमध्ये 1 मे ते 2 जून दरम्यान तात्पुरती वाढ करण्यात आली आहे. यामध्ये 2 सेकंड स्लीपर क्लास कोचची संख्या वाढवण्यात येणार आहे.


दुसरीकडे, भिवानी-कानपूर-भिवानी या दोन्ही फेऱ्यांमध्ये 1 मे ते 1 जून दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात डब्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. यामध्ये एक थर्ड एसी आणि एक सेकंड स्लीपर क्लास कोच वाढवण्यात येणार आहेत. सराय रोहिल्ला-उदयपूर शहर-दिल्ली सराय रोहिल्ला, या ट्रेनमध्ये 1 मे ते 1 जून या कालावधीत 2 सेकंड स्लीपर क्लास कोचची संख्या वाढवण्यात येणार आहे. उदयपूर शहर-खजुराहो-उदयपूर शहरामध्ये 1 मे ते 3 जूनपर्यंत थर्ड एसी आणि 1 सेकंड स्लीपर क्लास कोचची संख्या वाढवण्यात येणार आहे.


त्याचप्रमाणे अजमेर-दादर-अजमेर या ट्रेनमध्ये 1 मे ते 30 मे दरम्यान थर्ड एसी डब्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. कोठी-दादर-भगत की कोठी ट्रेनमध्ये 2 मे ते 31 मे दरम्यान 3 थर्ड एसी कोच आणि 3 सेकंड स्लीपर क्लास डब्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे.