काय म्हणता? Indian Railways नं साक्षात मारुतीरायालाच पाठवलीये नोटीस; कारणही चक्रावून टाकणारं
पवनसूत हनुमानाविषयी नव्यानं सांगण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण, हिंदू पुराणकथांमधून अंजनीच्या या पुत्राविषयी बरीच माहिती देण्यात आली आहे. रामायणाच्या (Ramayana) माध्यमातूनही मारुतीराया आपल्या भेटीला आला आहे.
Lord Hanuman Gets Notice From Railways: पवनसूत हनुमानाविषयी नव्यानं सांगण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण, हिंदू पुराणकथांमधून अंजनीच्या या पुत्राविषयी बरीच माहिती देण्यात आली आहे. रामायणाच्या (Ramayana) माध्यमातूनही मारुतीराया आपल्या भेटीला आला आहे. पण, आता मात्र हाच मारुतीराया, म्हणजे साक्षात भगवान हनुमान भारतीय रेल्वेच्या वाटेतील अडथळा ठरतोय. म्हणूनच की काय, Indian Railway नं धाडस दाखवत हनुमानालाच नोटीस बजावली आहे. नेमकं प्रकरण काय, हाच प्रश्न तुम्हालाही पडतोय ना?
(jharkhand) झारखंडच्या धनबाद शहरात एका मंदिराच्या वास्तूला बेकायदेशीर ठरवत भारतीय रेल्वे विभागानं त्यावर कारवाईचा बडगा उगारल्याचं दिसत आहे. 10 दिवसांची मुदत देत ही जमीन रिकामी करुन (Railway) रेल्वे सेक्शन इंजीनियरकडे सोपवण्यास सांगितलं आहे. शहरातील वेस्ट डॅमपाशी असणाऱ्या एका मंदिरावर ही नोटीस लावण्यात आली आहे.
थेट हनुमानालाच संबोधित करत या नोटिसमध्ये त्यांनी बेकायदेशीररित्या रेल्वेच्या जमिनीवर ताबा केल्याचं म्हटलं गेलं आहे. हा अपराध असल्याचं सांगत त्यांनी 10 दिवसांच्या आत ही जागा न सोडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. सदर नोटिसीला स्थानिकांनी विरोध केला. सोमवार आणि मंगळवारच्या सुमारास नागरिकांनी या मंदिरात गर्दी करत भारतीय रेल्वेचा विरोध केला.
अधिक वाचा : Ration Card धारकांसाठी वाईट बातमी; सरकारच्या नव्या आदेशामुळे कार्ड होणार रद्द, कारण काय?
फक्त मंदिरच नव्हे, तर त्यानजीकच्या परिसरात असणाऱ्या खटीक वस्तीलाही बेकायदेशीर ठरवत ती हटवण्याची मागणी रेल्वेनं केली आहे. पण, आपण इथं 1921 पासून वास्तव्यास असल्याचं म्हणत या समुदायानं सदर कारवाईविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या भागात फळ विक्री, मासेमारी, भाजी विक्री करणारे आणि हातावर पोट असणारे अनेकजण राहतात. पण, आता त्यांच्या घरांवरही रेल्वेनं कारवाई करण्यासाठी पावलं उचलली आहेत.