Amazon Prime च्या पंचायत वेबसिरीजच्या दोन्ही सीजनला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. या दोन्ही सीझनला प्रेक्षकांनी इतकं प्रेम दिलं आहे की त्यांच्यावर अनेक मीम्सही बनवण्यात आले आहेत.त्यातील देख रहा है ना बिनोद हा डायलॉग मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावरील युजर्सपासून राजकारण्यांपर्यंत तसेच सरकारी अधिकाऱ्यांनाही या डायलॉगची भुरळ पडली आहे. एकमेकांना डिवचण्यासाठी राजकारणी या डायलॉगच्या मीमचा वापर करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे प्रशासनाकडूनही या मीम्सचा वापर  सरकारी कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केला जात आहे. 


अशातच सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव असणाऱ्या रेल्वे मंत्रालयांनेही याच मीम्सचा वापर केला आहे.चिनाब नदी काश्मीर खोऱ्याला उर्वरित भारताशी जोडण्याचे काम सध्या वेगाने सुरु आहे. 


या चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल पूर्ण झाला आहे. 2002 मध्ये त्याचे बांधकाम सुरू झाले होते. 2008 मध्ये सुरक्षा आणि इतर कारणांमुळे त्याचे बांधकाम थांबवण्यात आले होते. त्यानंतर 2010 मध्ये पुन्हा काम सुरू झाले आणि तो आता तयार झाला आहे. 


जगातील सर्वात उंच असलेल्या या रेल्वे पुलावरील ओव्हरआर्क डेकचा अंतिम तुकडा बसवण्यात आला. याला गोल्डन जॉइंट असेही म्हटले जात आहे. याद्वारे रेल्वेने थेट काश्मीरला जाता येणार आहे. 


त्यानंतर भारतीय रेल्वेनेही यासंदर्भात माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मीम्सचा वापर केला आहे. पंचायतमधल्या डायलॉगचा वापर करत भारतीय रेल्वेने बांधलेला हा पूल आयफेल टॉवरपेक्षाही उंच असल्याचे म्हटले आहे.



दरम्यान,हा पूल जिथे बांधला गेला आहे त्या ठिकाणापासून दोन देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमा फार दूर नाहीत. त्यामुळे या पुलाला मोठे महत्त्व आहे. या पुलावरून लष्कराला रेल्वेने सहज ये-जा करता येणार आहे. चिनाब रेल्वे पूल जम्मूच्या कटरा आणि काश्मीरच्या बनिहालच्या 111 किमी लांबीच्या दुर्गम रस्त्याला जोडण्यासाठी काम करेल. हा पूल उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा एक भाग आहे.