Indian Railways: रेल्वे तिकिटावर असलेले WL, RSWL, PQWL, GNWL या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहितीय का?
Indian Railways: लांब पल्ल्याच्या तिकीटाचे बुकींग केल्यानंतर त्यावर पीएनआर नंबर, CNF, RAC, WL, RSWL,PQWL,GNWL अशा विविध शब्दांचा उल्लेख केलेला असतो.
Indian Railways Booking: लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आपण रेल्वे तिकीट बुक करतो. तेव्हा आपल्याला असे अनेक संक्षेप आढळतात ज्यांची आपल्याला माहिती नसते. रेल्वे तिकीटावर CNF, RAC, WL, RSWL, PQWL, GNWL सह कोड अनेक प्रवाशांना गोंधळात टाकतात. यातील काही शब्दांचा अर्थ आपल्याला माहिती असतो. मात्र काही शब्द हे आपण पहिल्यांदाच ऐकत असतो. त्यामुळे तुमच्या रेल्वे तिकीटावर (Railway ticket) या शब्दांचा उल्लेख असेल तर त्याचा अर्थ माहिती असणे गरजेचे आहे.
PNR: PNR म्हणजे पॅसेंजर नेम रेकॉर्ड. जेव्हा तुम्ही रेल्वेच्या तिकीटाचे आरक्षण करता त्यावेळी तुम्हाला दहा अंकी पीएनआर क्रमांक दिला जातो. याद्वारे तुम्हाला तिकीटाचे तपशील तपासता येतो.
WL: WL हा कोड प्रतिक्षा यादीत असलेल्या तिकीटावर लिहिलेला असतो. अनेकदा हा कोड तुम्हाला पाहायला मिळतो. जर तुमच्या तिकीटावर GNWL 16/ WL 15 असे लिहिलेले असेल, तर तुमच्याआधी तिकीट बुकींग केलेल्या 15 प्रवाशांनी तिकीट रद्द केल्यावर तुमचे तिकीट कन्फर्म होते.
RSWL: याचा अर्थ रोड साईड वेटींग लिस्ट (Road Side Waiting List). हा कोड असलेली तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता फार कमी असते.
RQWL: एका इंटरमीडिएट स्टेशनवरून दुसर्या इंटरमीडिएट स्टेशनवर तिकीट बुक करायचे असल्यास, आणि जर ते सामान्य कोटा किंवा रिमोट लोकेशन कोटा किंवा पूल केलेल्या कोट्यामध्ये समाविष्ट नसेल, तर तिकीट प्रतीक्षा यादीसाठी प्रतीक्षा यादीची विनंती करा).
RAC: आरएसी या शब्दाचा अर्थ म्हणजे Reservation Against Cancelation. RAC म्हणजे दोन प्रवाशांना एकाच बर्थवर प्रवास करण्याची परवानगी आहे. ही तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता सर्वाधिक असते.
CNF: जर तुमच्या तिकिटावर CNF लिहिलेल असेल तर तुमची तिकीट कन्फर्म झाली आहे. ट्रेनचा चार्ट तयार झाल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट क्रमांक दिला जातो.
वाचा : Facebook व्हिडीओ डाऊनलोड करता येत नाही, फॉलो करा 'या' टिप्स
CAN : जेव्हा एखादा प्रवाशी तिकीट रद्द करतो, तेव्हा त्यावर CAN असे लिहिले जाते. याचा अर्थ त्या प्रवाशाचे तिकीट रद्द करण्यात आले आहे, असा होतो.
GNWL: जनरल वेटींग लिस्ट (Genral Waiting List) असा या कोडचा अर्थ असतो. ही यादी प्रतिक्षा यादीतील प्रवाशांचे कन्फर्म तिकीट रद्द झाल्यानंतर दिले जाते. या प्रतिक्षा यादीचा हा सर्वात सामान्य प्रकार आहे. ही तिकीट बहुतांश वेळा कन्फर्म होते.
TQWL: (तत्काळ कोटा प्रतीक्षा यादी) – ही तत्काळ तिकिटांची प्रतीक्षा यादी आहे. तुम्ही तात्काळ तिकीटांची बुकींग केल्यावर जर तुमचे नाव TQWL या यादीत दिसत असेल तर ते कन्फर्म होण्याची शक्यता फार कमी असते.
RLWL : (रिमोट लोकेशन वेटिंग लिस्ट): रिमोट लोकेशन वेटिंग लिस्टमध्ये तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता सर्वाधिक असते. हा कोटा छोट्या स्टेशनसाठी दिला जातो. या स्टेशनवरील वेटिंग बर्थला RLWL असे म्हणतात.
NOSB – रेल्वे 12 वर्षाखालील लहान मुलांच्या तिकीटाचे पैसे आकारते. मात्र त्यांना वेगळी सीट दिली जात नाही. त्यावेळी त्या लहान बालकांच्या नावासमोर NOSB हा कोड लिहिला जातो.