Facebook व्हिडीओ डाऊनलोड करता येत नाही, फॉलो करा 'या' टिप्स

Facebook : फेसबुक हे एक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. इंस्टाग्राम प्रमाणेच फेसबुकनेही रील्स शेअर करायला सुरुवात केली आहे. 

Updated: Nov 9, 2022, 12:55 PM IST
Facebook  व्हिडीओ डाऊनलोड करता येत नाही, फॉलो करा 'या' टिप्स  title=

Facebook Video : आजच्या या काळात फेसबुक वापरत नसेल अशी एकही व्यक्ती शोधून देखील सापडणार नाही. फेसबुक (facebook) हे केवळ मित्रांसोबत बोलण्यासाठी नव्हे तर करमणुकीचे स्रोत बनले आहे. या प्लॅटफॉर्मवर लाखो लोक फोटोज शेअर करतात, माहिती शेअर करतात, व्हिडिओ पाहतात. परंतु, फेसबुकवर असा पर्याय उपलब्ध नाही. ज्यावरून व्हिडिओ डाउनलोड करता येतील. काळजी करण्याचे कारण नाही. कारण आज आम्ही येथे तुम्हाला खास ट्रिक्स सांगणार आहोत. अशा अनेक वेबसाईट आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही लवकर व्हिडिओ डाऊनलोड करू शकता.

CleverGet Video Downloader

CleverGet Video Downloader पूर्वी Leawo Video Downloader म्हणून ओळखले जायचे. हे Mac किंवा Windows साठी सर्वोत्तम व्हिडिओ डाउनलोडर आहे. या साइटच्या मदतीने तुम्ही 1000 हून अधिक वेबसाइटवरून व्हिडिओ, शो, लाईव्ह स्ट्रीमिंग आणि म्युझिक व्हिडिओ डाउनलोड करू शकता. ही वेबसाइट YouTube, Instagram, Yahoo, MyVideo, Dailymotion ला देखील सपोर्ट करते म्हणजेच तुम्ही त्यांचे व्हिडिओ देखील येथून डाउनलोड करू शकता.

VideoProc

व्हिडीओप्रोक ही व्हिडीओ डाऊनलोडिंगसाठी उत्तम वेबसाइट आहे. तुम्ही VideoProc वर व्हिडिओचा आकार देखील कमी करू शकता. याशिवाय, VideoProc 4K/HDR व्हिडिओ, ऑडिओ आणि DVDs रूपांतरित करण्यास देखील सक्षम आहे. येथून तुम्ही लहान व्हिडिओ देखील डाउनलोड करू शकता.

वाचा : स्लो Internet चा त्रास होतोय! तर या सोप्या टिप्स फॉलो करा, इंटरनेटचा वेग वाढेल

Allavsoft Video and Music Downloader

जर तुम्ही विंडोजसाठी व्हिडिओ आणि संगीत डाउनलोड करू शकणारी साइट शोधत असाल तर ही साइट तुमच्यासाठी योग्य आहे. हा एक प्रीमियम व्हिडिओ डाउनलोडर आहे.

या साइटची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या साइटवर फेसबुकचे अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात डाउनलोड करता येतात. Facebook व्यतिरिक्त ही साइट Spotify, Soundcloud, Deezer ला देखील सपोर्ट करते.

fdown.net

तुम्हाला या साइटबद्दल माहिती असेलच. फेसबुक व्हिडीओ डाउनलोडर्सच्या यादीत Fdown चे नाव प्रथम येते. Google देखील हे सुचवते. या साइटवर व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला खाते तयार करण्याचीही गरज भासणार नाही. हे वापरण्यास देखील खूप सोपे आहे.

SnapSave

SnapSave देखील एक उत्तम फेसबुक व्हिडिओ डाउनलोडर आहे. तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करण्यापूर्वी त्याचे रिझोल्यूशन देखील अंतिम करू शकता. तुम्ही या साइटवरून 4K व्हिडिओ देखील डाउनलोड करू शकता. तुम्ही फोनच्या ब्राउझरमध्येही ते वापरू शकता.

Video downloader for Facebook

नावाप्रमाणेच हे फेसबुक व्हिडिओ डाउनलोडर आहे. तुम्ही त्याचे अॅप तुमच्या फोनवरही डाउनलोड करू शकता. त्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डाऊनलोड करण्यासोबतच तुम्ही त्यावर इतर व्हिडिओही शोधू शकता.