मुंबई : तुम्ही अनेक वेळा रेल्वेने प्रवास केला असाल. भारतीय रेल्वे  (Indian Railway) हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वेचे जाळे आहे. सर्व वर्गातील लोक रेल्वेमधून प्रवास करतात. भारतीय रेल्वेशी संबंधित अनेक मनोरंजक गोष्टी आहेत, ज्याबद्दल अनेक लोकांना माहिती नाही. आम्ही तुम्हाला रेल्वेशी संबंधित अशाच एका गोष्टीबद्दल सांगणार आहोत.  रेल्वे गाड्यांच्या छतावर गोल आकाराचे झाकण का लावलेले असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही अनेकवेळा रेल्वे पुलाच्यावरून रेल्वे डब्याच्या वर गोल आकाराचे झाकण तुम्ही पाहिले असेलच. हे झाकण का झावलेले असेत, ते मात्र तुम्हाला माहित नसते.  रेल्वेच्या डब्यावर गोलाकार आकाराची ही रचना का केली जाते?, त्याचे नक्की काय काम असते, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील.



रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या डब्यांच्या छतावर बसवलेल्या या प्लेट्स किंवा गोलाकार आकारांना रूफ व्हेंटिलेटर (Roof Ventilator) म्हणतात. जेव्हा ट्रेनच्या डब्यात प्रवाशांची संख्या जास्त असते तेव्हा गर्मी खूप जास्त वाढते. ही उष्णता किंवा गर्मी अथवा सफोकेशन बाहेर पडण्यासाठी खूप गरजेचे असते. त्यासाठी रेल्वेच्या डब्यात ही विशेष व्यवस्था केली जाते. अन्यथा ही व्यवस्था नसेल तर रेल्वेच्या डब्ब्यात राहणे खूप कठीण होऊ शकते.



तसेच, तुम्ही रेल्वेच्या डब्यात आतमध्ये एक जाळी पाहिली असेल, ज्यामुळे रेल्वे डब्ब्यातील गॅस बाहेर जाण्यास मदत होते. म्हणजेच, कोचवर कुठेतरी जाळी असते आणि छिद्र असते. ज्यातून हवा बाहेर जाते. तुम्हाला माहित असेल की गरम हवा नेहमी वरच्या दिशेने जाते, म्हणून कोचच्या आत छतावरील या गोलाकार प्लेट्स बसवल्या जातात.



रेल्वे डब्ब्यातील गरम हवा बाहेर जाण्यासाठी रेल्वेच्या वरच्या छतावर गोल प्लेट्स लावल्या जातात आणि रेल्वेच्या आतल्या छतावर जाळी बसवली जाते. ज्याद्वारे गरम हवा छतावरील व्हेंटिलेटरमधून बाहेर पडते. त्याचवेळी, या जाळीवर आणखी एक प्लेट लावली जाते, जेणेकरून जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पावसाचे पाणी रेल्वेच्या आत येऊ नये.