सियाचीन : सर्वांत उंच बर्फाळ प्रदेश असलेल्या सियाचीन प्रदेशाला सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्व आहे. त्यामुळे त्या भागात तैनात असलेल्या जवानांची खूप मोठी परीक्षा असते. सियाचीन सारख्या उंच ठिकाणी ऑक्सिजनची पातळीही कमी असते. अशा परिस्थिीत स्वत: सोबत देशाचे रक्षण करणे हे आव्हान भारतीय जवान मोठ्या हिंमतीने पार पाडत असतात. दिवसरात्र जागता पहारा देत सियाचीन हद्दीचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या हिंमतीला दाद द्यावी तितकी कमीच आहे. सियाचीनमध्ये तैनात असलेल्या भारतीय जवानांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सैनिकांना आंघोळीसाठी आता 90 दिवस थांबण्याची गरज नाही. आपल्या शरीराच्या स्वच्छतेसाठी त्यांना स्वदेशी उत्पादन पोहोचवले जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सैनिकांना शरीराच्या स्वच्छतेसाठी स्वदेशी निर्मितीचे उत्पादन पाठवण्यात येणार आहेत. हिंदुस्थान टाईम्सने या संदर्भातील वृत्त दिले आहे. सैनिकांना पाठवण्यात येणाऱ्या या उत्पादनाला पाण्याची गरज नसेल. सियाचीनमध्ये 21 हजार 700 फूट च्या उंचीवर तैनात सैनिकांना 3 महिन्यापर्यंत आंघोळही करता येत नाही. भारतीय सेनेतर्फे सियाचीन ग्लेशियरवर 3 हजार सैनिक पाहारा देत असतात. इथले तापमान 60 डिग्री सेल्सियस पेक्षा कमी असते. भारतीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिमहत्त्वाच्या असलेल्या या सीमेच्या सुरक्षेसाठी प्रतिदिन 7 कोटी रुपये खर्च केले जातात.


ऑक्सिजन पुरवठा 


सिर्फ फाउंडेशनच्या माध्यमातून सियाचीनमध्ये सैनिकांसाठी ऑक्सिजन पुरवठा प्रकल्प उभारण्याचा संकल्प केलाय. त्यासाठी किमान एक कोटी दहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी निधी जमवण्याची सुरुवात म्हणून सुमेधा चिथडे यांनी स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या विकल्या असून, त्यातून आलेले सुमारे सव्वा लाख रुपये त्यांनी या कामासाठी देणगी म्हणून दिले.


दागिने विकले 


पुण्यातील 56 वर्षीय सुमेधा आणि पती योगेश चिताडे या वृद्ध दाम्पत्याने सियाचीनच्या सिमेवर तैनात असणाऱ्या जवानांच्या मदतीसाठी आपले दागिनेही विकले. सियाचीनमध्ये ऑक्सिजन प्लान्ट बनवण्याचा आपला उद्देश असल्याचं या दाम्पत्याचं म्हणणं आहे. विकलेल्या दागिन्यांतून जे सव्वा लाख रुपये मिळाले ते पैसे त्यांनी आपल्या मिशनसाठी ट्रस्टमध्ये जमा केलेत.