बिकानेर : राजस्थानमधील पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या बिकानेरजवळ भारतीय हवाई दलानं पाकिस्तानचं ड्रोन पाडलंय. एअर टू एअर मिसाईलद्वारे ही कारवाई करण्यात आलीय. हे ड्रोन पाडल्यानंतर त्याचे तुकडे पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन पडले. सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पाकिस्तानच्या ड्रोननं भारतीय हद्दीत घुसखोरी केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.


ग्राऊंड रडार स्टेशनला पहिल्यांदा पाकिस्तानचं हे ड्रोन दिसलं होतं. २६ फेब्रुवारीला भारतीय वायुसेनेनं जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यावर केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेनं दुसऱ्यांदा पाकिस्तानचं ड्रोन उद्धवस्त केलं आहे. २६ फेब्रुवारीला सकाळी गुजरातच्या कछमध्ये पहिलं ड्रोन पाडण्यात आलं होतं. स्पायडर एयर डिफेन्स सिस्टिमच्या डर्बी मिसाईलनं हे ड्रोन पाडलं.