`आरोग्य सेतु` ऍपने गाठला आणखी एक उच्चांक
आरोग्य सेतु ऍपला नागरिकांची पसंती
मुंबई : कोरोना व्हायरस (Corona Virus)चा प्रसार नियंत्रित ठेवण्यासाठी 'आरोग्य सेतु' ऍप तयार करण्यात आलं आहे. या ऍपच्या नावावर आणखी एक नवीन रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. 'आरोग्य सेतु' जगभरातील सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आलेला कॉन्टेक्ट-ट्रेसिंग (Contactt-Tracing) ऍप बनला आहे.
सेंसर टॉवर स्टोर इंटेलिजेंसच्या यांच्या संशोधनानुसार, मार्च २०२० नंतर १३ देशांकरता १७३ मिलियन विभिन्न लोकांनी कोविड-१९ कॉन्टेक्ट-ट्रेसिंग ऍप डाऊनलोड केलं आहे. १२७.६ मिलियन डाऊनलोडसोबतच भारताचं 'आरोग्य सेतु' ऍप या यादीत टॉपवर आहे.
'आरोग्य सेतू' नंतर ११.१ मिलियन डाऊनलोडसोबत तुर्कीचे 'हयात ईव सियार ऍप' दुसरे आणि १०.४ मिलियन डाऊनसोडसोबत जर्मनीचे 'कोरोना-वॉर्न-ऍप' तिसऱ्या स्थानावर आहे. हे संशोधन २० मिलियन किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या १३ देशांत सरकार समर्थित कॉन्टेक्ट-ट्रेसिंग ऍप्स वर करण्यात आलं आहे. यामध्ये भारतासोबतच ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, पेरू, फिलीपींस, सऊदी अरब, थायलँड, तुर्की आणि वियतनाम यांचा समावेश आहे.
जवळपास १३ बिलियन लोकांची संयुक्त लोकसंख्या असलेल्या १३ देशांत एकूण १७३ मिलियन लोकांनी सरकारद्वारे तयार केलेल्या कॉन्टेक्ट-ट्रेसिंग ऍप डाऊनलोड केलेत. लोकसंख्येचा विचार करता ४.५ मिलियन यूनिक इन्स्टॉलसोबत ऑस्ट्रेलियाच्या COVIDsafe ऍपच्या एडॉप्शन रेट सर्वाधिक आहे.
२ एप्रिल रोजी झालं होतं लाँच
'आरोग्य सेतु' ऍप २ एप्रिल रोजी लाँच करण्यात आलं होतं. लॉचिंगनंतर अवघ्या १३ दिवसांत अंतर्गात ५० मिलियन लोकांनी हे ऍप डाऊनलोड केलं होतं. आता १२७.६ मिलियन लोकांनी हे ऍप डाऊनलोड केलं आहे. महत्वाचं म्हणजे सर्वाधिक वेळा डाऊनलोड झालेलं हे ऍप ठरलं आहे.