मुंबई : देशात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात २४,२४८ नवे कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. यामध्ये ४२५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून सोमवारी जाहीर केलेल्या अपडेटनुसार, देशात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा ६ लाख ९७ हजार ९१३ इतका पोहोचला आहे. तर यामध्ये मृतांचा आकडा हा १९ हजार ६९३ इतका आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत ४ लाख २४ हजार ४३३ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. २४ तासांत १५ हजार ३५० रूग्णांनी कोरोनाशी दोन हात केले आहे. देशात ऍक्टिव केसची संख्या २ लाख ५३ हजार २८७ इतकी आहे. आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार, ५ जुलैपर्यंत ९९ लाख ६९ हजार ६६२ लोकांची स्लॅब टेस्ट करण्यात आली. (महत्वाची बातमी! कोरोनावरील लस २०२१ पूर्वी शक्य नाही) 


 


कोरोनाच्या आकडेवारीत भारताने रशियाला देखील मागे टाकलं आहे. भारत त्या टॉप तीन देशात आहे जेथे कोरोनाचं संक्रमण सर्वाधिक आहे. अमेरिका, ब्राझील पाठोपाठ भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण आहेत. 


कोरोनाचा प्रभाव 'या' पाच राज्यात सर्वाधिक 


महाराष्ट्र : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा २ लाखाच्या पार गेला आहे. आतापर्यंत ८८२२ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १ लाख ११ हजाराहून अधिक कोरोनाबाधित बरे झाले आहेत. राज्याच ८६ हजार ऍक्टिव्ह केसेस आहेत. 


तामिळनाडू : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढ आहे. आतापर्यंत १ लाख ११ हजार कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. ज्यामध्ये १५१० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ४७ हजार ऍक्टिव्ह केसेस आहेत. 


दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत जवळपास १ लाखापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा गेला आहे. ज्यामध्ये ३ हजारहून अधिक रूग्णांचा मृत्यू झाला आहे. ७१ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर २५ हजार ऍक्टिव्ह रूग्ण आहेत. 


गुजरात : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला आहे. ३६ हजाराहून अधिक कोरोना रूग्ण आढळले आहेत. तर १९४३ लोकांचा मृत्यू झाला आहे. जवळपास २६ हजार लोक बरे झाले आहेत. आता राज्यात ८ हजारहून रूग्ण ऍक्टिव्ह आहेत. 


उत्तर प्रदेश : राज्यात एकूण २७ हजार ७०७ कोरोनाबाधित आहेत. ज्यामध्ये ७८५ लोकांचा मृत्यू झालाय तर १८ हजार ७६१ रूग्ण बरे झाले आहेत. आता ८१६१ ऍक्टिव्ह केसेस आहेत.