नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची आकडेवारी सतत वाढते आहे. गेल्या 24 तासांत देशात 54 हजार 736 नवे रुग्ण आढळले आहेत. तर एका दिवसात 853 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना रुग्ण संख्येने तब्बल 17 लाखांचा आकडा पार केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 17 लाख 50 हजार 724 इतकी झाली आहे. तर सध्या 5 लाख 67 हजार 730 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. भारतात आतापर्यंत 11 लाख 45 हजार 630 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 37 हजार 364 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 



देशात कोरोना रुग्ण संख्येत जागतिक स्तरावर भारत तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्येचा विचार करता अमेरिका आणि ब्राझील यांच्यानंतर भारताचा क्रमांक लागतो.


कोरोनाशी लढण्यासाठी अधिक तयारीची गरज; WHOचा भारताला इशारा


देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या एकट्या महाराष्ट्रात आहे. शनिवारी राज्यात 9,601 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, तर 322 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 4,31,719 एवढी झाली आहे. यापैकी 1,49,214 ऍक्टिव्ह रुग्ण असून, आजपर्यंत एकूण 2,66,883 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत.