नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आज कोरोना रुग्णांची संख्या ६४ लाखांवर पोहोचली असून गेल्या २४ तासांमध्ये ७९ हजार ४७६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार ६९ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. देशात ६४ लाख ७३ हजार ५४५ जण कोरोना बाधित झाले आहेत.  देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असताना देखील दिलासा देणारी बाब म्हणजे देशातील कोरोना या धोकादायक विषाणूवर मात करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या देशात ९ लाख ४४ हजार ९९६ रुग्ण उपचार घेत आहेत . त्याचप्रमाणे ५४ लाख २७ हजार ७९७ रुग्णांनी या धोकादायक विषाणूवर मात केली आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे देशात तब्बल १ लाख रुग्णांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. 



देशात आतापर्यंत ७,७८,५०,४०३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत,  तर शुक्रवारी ११ लाख ३२ हजार ६७५ चाचण्या करण्यात आल्या आहेत.