मुंबई : जर तुम्ही विमानाने प्रवास करत असाल आणि वेब चेकइन करत असाल तर आता ही सेवा मोफत मिळणार नाही. स्पाइस जेट आणि इंडिगो या दोन एअरलाइन्सने या करता फी आकारण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात स्वस्त असलेल्या एअरलाइन्स कंपन्यांची हालत खराब होत आहे. याकरता नवं नवे पर्याय शोधून काढत आहे. याबाबत प्रवाशांनी विरोध दर्शवायला सुरूवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअरपोर्टवर चेक इन ही सेवा मोफत असणार असून इंडिगोकडून 100 रुपये आणि स्पाइस जेटकडून 99 रुपये फी आकारली जाणार आहे. या अगोदर प्रवाशांना आपल्या आवडीची सीट निवडण्यासाठी अधिक रक्कम भरावी लागत होती. 


अनेकांना विंडो फेसिंग आणि अतिरिक्त लेग स्पेसच्या सीटकरता अधिक पैसे द्यावे लागत होते. पण गोएअर ही सेवा अजूनही फ्री सेवा पुरवत आहे. पण गोएअर ही सेवा अजून किती दिवस मोफत देणार आहे याबाबत कोणतीच माहिती नाही. तर जेट एअरवेज आणि विस्तारा सीट निवडण्यासाठी कोणतेही चार्ज आकारले जाणार नाहीत. 



अशाप्रकारच्या सेवांना फी आकारून कंपनी आपले उत्पन्न वाढवत आहे. यामध्ये बॅगेज फी, सीट सिलेक्शन फी आणि कॅन्सलेशन फीचा देखील समावेश आहे. इंडिगोने याबाबत अधिकृत माहिती दिली असून त्यांनी सीटच्या एडव्हान्स सिलेक्शनच्या किंमततीत देखील बदल केला आहे. हे काम पूर्ण विश्व आणि भारतात एअरलाइन्स करणार आहे. 


या मुद्यावर विमान मंत्रालयाकडून ट्विट करण्यात आलं आहे. मंत्रालयानुसार ते या प्रकरणाची चौकशी करणार असून ही गोष्ट अनबंडल्ड प्रायसिंगच्या नियमांतर्गत येणार की नाही याची तपासणी करणार आहे. विमानन रेग्युलेटरने एअरलाइन्सला या प्रकारच्या सेवेकरता फी आकारण्याची मंजूरी दिली आहे.