हैदराबाद : इंडिगो एअरलाईन्सच्या एका एअर होस्टेसचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चर्चेत आलाय. ही घटना हैदराबादच्या राजीव गांधी एअरपोर्टवर घडली आहे. या व्हिडिओत एक तरूण एअर होस्टेसच्या पाया पडताना दिसत आहे. तरूणाने एअर होस्टेससोबत गैरवर्तन केल्याने हा प्रकार घडल्याचं समजतं. 


काय आहे प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओतील महिला कर्मचारी आपल्या सकाळच्या शिफ्टची रिपोर्ट द्यायला एअरपोर्टला येत होती. अशात दोन तरूण तिचा पाठलाग करत असल्याचे तिच्या निदर्शनास आहे. त्यानंतर दोघांनी तिच्यावर अश्लील कमेंट पास केल्या. त्यातील एका नंतर तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. पण महिला त्यांच्याकडे दुर्लक्ष करत चालत राहिली. या कृत्यानंतर महिलेने लगेच एअरपोर्ट उपस्थित एका ट्रॅफिक पोलिसाला आवाज दिला.


पाया पडून मागितली माफी...


भारत आणि कल्याण नावाचे हे दोघे तिच्यावर घाणेरड्या कॉमेंट्स पास करत होते. ट्रॅफिक पोलिसाने या दोघांना पकडून पोलीस स्टेशनला नेले. दोघेही दारू पिऊन होते. त्यांच्यावर कारवाई होणार हे पाहून त्यातील एकाने महिलेला माफी मागितली. तर त्या महिलेने त्याला पाया पडून माफी मागण्यास सांगितले. व्हिडिओत दोघेही एअरहोस्टेसच्या पाया पडताना दिसताहेत.


ताकीद देऊन सोडले....


इंडिगोचे अधिकारी म्हणाले, दोघांना पोलिसांनी पकडताच ते स्टाफ मेंबरची माफी मागू लागले. यानंतर आमच्या स्टाफ मेंबरने दोघांविरुद्ध अधिकृत तक्रार दिली नाही. काही तासांत कस्टडीत ठेवल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपी विद्यार्थ्यांना ताकीद देऊन सोडले.