Indira Gandhi's Birth Anniversary: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान  इंदिरा गांधी यांची आज जयंती आहे. भारताच्या आयर्न लेडी म्हणून इंदिरा गांधी यांचे नाव घेतले जाते. इंदिरा यांचा जन्म 19 नोव्हेंबर रोजी नेहरू कुटुंबात झाला होता. आज इंदिरा गांधी यांची 107 वी जयंती साजरी केली जात आहे. भारताच्या राजकारणात इंदिरा गांधींचा मोलाचा वाटा आहे. 1962 साली झालेल्या चीन युद्धादरम्यानचा एक किस्सा चर्चेत आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

20 ऑक्टोबर 1962 साली आकसाई चिन आणि अरुणाचल प्रदेशवर चीनने अचानक हल्ला केला होता. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना चीन असं काही कपटी विचार करत आहे याची थोडीदेखील भनक लागली नव्हती. चीनच्या या हल्ल्यामुळं त्यांच्यासमोर मोठं आव्हान उभं ठाकलं होतं. सीमा वादाच्या मुद्द्यावर पंडित नेहरु आणि चीनचे तेव्हाचे नऊ वरिष्ठ नेता झाऊ एन-ली यांच्यात अनेकदा बैठका झाल्या होत्या अनेक प्रस्तावांवर चर्चादेखील झाली होती. त्यानंतरही चीनने अचानक भारतावर हल्ला केला. 


शेजारील देशच भारतासाठी घातक ठरले होते. या युद्धामुळं देशाची अवस्था अधिकच बिकट झाली होती. देशवासियांनी या युद्धामुळं जेवण-पाणीदेखील सोडलं होतं. लष्कराच्या सपोर्टसाठी देशाचा प्रत्येक नागरिक उभा होता. युद्धात लढण्यासाठी देशाजवळ हत्यारेदेखील नव्हता. तरीदेखील सैनिक युद्धभूमीवर जीवाची बाजी लावून लढत होते. संपूर्ण एक महिना झाला तरी युद्ध सुरूच होते. भारतासाठी एक एक दिवस कठिण ठरत होता. भारतीय सैन्यात भरती होण्यास उत्सुक होते. महिलादेखील घराबाहेर पडून रायफल चालवण्याचा अभ्यास करत होत्या. 



देशाची परिस्थिती बिकट असताना इंदिरा गांधी यांनीदेखील देशाला हातभार लावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांचे सगळे दागिने लष्करासाठी दान केले. दोन नोव्हेंबर 1962 साली इंदिरा गांधी त्यांचे सगळे दागिने घेऊन सैन्याच्या सेंटरवर पोहोचल्या. त्यांनी नॅशनल डिफेंस फंडमध्ये सर्व दागिने दान केले होते. त्यांच्या दागिन्यांचे वजन 336 ग्रॅम इतके होते. त्यानंतर ही एक मोहिमच सुरू झाली. महिला घराबाहेर पडून राष्ट्रीय सुरक्षा निधीमध्ये दागिने, पैसे दान करायला लागली. महिलांमा मंगळसूत्रदेखील सेनेच्या दानपेटीत टाकलं होतं. यात मुलंदेखील मागे राहिले नाहीत तर गल्ला फोडून ते पैसे सेनेसाठी दान करायचे.