नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान तणावपूर्ण परिस्थितीत सर्वपक्षीय बैठकीत  पंतप्रधान नरेंद्र मोदी का नव्हते, असा थेट सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विचारला आहे. सरकारकडून शहिदांच्या बलिदानाचे राजकारण होत असल्याचाही आरोपही, यावेळी राहुल गांधी यांनी केला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने विश्वासात घेतले नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. नवी दिल्लीत देशातल्या २१ विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच २६ फेब्रुवारी रोजी भारतीय वायुदलाने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याचेही या बैठकीत कौतुक करण्यात आले. शिवाय पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वैमानिकाबाबतही या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदी का नव्हते, असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच सत्ताधारी पक्ष शहिदांच्या बलिदानाचे राजकारण करत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला आहे. जैश ए मोहम्मदच्या दहशवाद्यांनी पुलावामात भाड्य हल्ला केला. यात ४० जवान शहीद झाले. त्यानंतर भारताने १२ व्या दिवशी पाकिस्तान हद्दीत घुसून बालाकोट येथे हल्ला केला. भारताकडून दहशतवाद्यांचे अड्डा उद्धवस्त करण्यात आला. यात ३५० दहशतवादी मारले गेल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर भारत - पाकिस्तानमधील तणाव वाढला. भारताला प्रत्युत्तर देण्याची भाषा  पाकिस्तानकडून करण्यात आली. पाकिस्तानच्या विमानांनी भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केली. यावेळी भारतीय नौदलाने पाकिस्तानची विमाने पळवून दिलीत. त्याचवेळी भारतीय नौदलाने आपले एक विमान गमावले.  दरम्यान, युद्धामध्ये भारतानं आतापर्यंत चारवेळा पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. पुन्हा युद्ध झाले तरी पाकिस्तान कधीच जिंकू शकत नाही. पाकिस्तानचा भारतासमोर टिकावच लागणार नाही.


दरम्यान, भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान एवढे संभ्रमात आहे की नेमकं करायचं काय, त्यामुळे पाकिस्तानचे राज्यकर्तेही चक्रावून गेलेत. पुढचे ७२ तास महत्त्वाचे आहेत, युद्ध होणार की शांती, याचा निर्णय पाकिस्तान पुढच्या ७२ तासांत घेणार, असे पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद अहमद यांनी म्हटले आहे. युद्ध झालं तर दुसऱ्या महायुद्धापेक्षाही भयंकर परिस्थिती असेल, अशी दर्पोक्ती त्यांनी केलीय. तर दुसरीकडे आम्हाला युद्ध नको, शांतता हवी, आम्ही भारताबरोबर बोलणी करण्यासाठी तयार आहोत, असे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते हसन गफूर यांनी म्हटले आहे. अशी परस्परविरोधी विधानं करणं ही पाकिस्तानची जुनी खोड आहे.