Medicine News : महागाईत आता आणखी एक धक्कादायक बातमी. सर्वसामान्य रुग्णांना रोज लागणारी औषधं महागत होणार आहेत. पेनकिलर्स, अँटी इन्फेक्टीव्ह, हृदयरोगावरील गोळ्या, अँटी बायोटीक्स महागणार आहेत. सरकारने औषध कंपन्यांना दरवाढीची परवानगी दिली आहे. ही दरवाढ जवळपास 12 टक्केहून अधिक असेल असं सांगितले जाते आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलग दुसऱ्यावर्षी औषधं महाग होत आहेत. 384 औषधं ही अत्यावश्यक औषधांच्या यादीत मोडतात. त्यांना शेड्युल्ड ड्रग्ज असं म्हटलं जातं. त्यांच्या किंमती वाढणार आहेत. याशिवाय उर्वरित नॉन शेड्युल्ड ड्रग्जच्या किंमती दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढतातच. औषधांच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे दरवाढीची मागणी सातत्याने केली जात होती. 


महागाईत रुग्णांना मोठा आर्थिक बोजा पडणार आहे. कारण कच्चा माल, पुरवठा, वाहतूक आणि इतर खर्चात वाढ झाल्याने औषधी कंपन्या दरवाढीची मागणी करत होत्या. जानेवारीपासून औषधांच्या किंमतीत वाढ करण्याची मागणी औषध कंपन्यांनी केली होती.  ही मागणी सरकारने मान्य केली आहे. त्यामुळे आता रोज लागणारी औषधे महाग होणार आहेत. त्यामुळे आता रुग्णांना जास्तीचे पैसे मोजावी लागणार आहेत. आता एप्रिल महिन्यापासून नवीन किंमतीनुसार, ग्राहकांवर बोजा पडणार आहे. 


औषधांच्या किंमतीत वाढ होण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. शेड्यूल ड्रग्सच्या किंमतीत जवळपास 10 टक्कांपर्यंत वाढ होण्याची शक्यता होती. मात्र, ही दर वाढ 12 टक्क्यांहून अधिक होण्याची शक्यता आहे. या औषधांच्या किंमतींवर सरकारचे नियंत्रण असते.  आता सरकारने याला मंजुरी दिल्याने औषधदरवाढ होणार आहे.


सरकारच्या या निर्णयामुळे औषध कंपन्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. फार्मास्युटिकल सेक्टरला आणि कंपन्यांना यामुळे खर्च भरुन निघण्यास मदत मिळेल.