Budget 2023: अर्थसंकल्पापूर्वी महागाईबाबत मोठी अपडेट, पाहा काय होणार?
Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र त्यापूर्वी महागाईबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
Union Budget 2023-24: महागाईमुळे (inflation) भारतच नाहीतर जगभरातील सर्वसामान्य नागरीक हैराण झाले आहेत. आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांना या वर्षातरी दिलासा मिळणार आहे का? अशातच भारतीयांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आर्थिक सर्वेक्षण (economic survey) सादर केलं. या आर्थिक सर्वेक्षणातून मोठा दिलासा भारतीयांना मिळाला आहे. या अहवालामुळे महागाईची साडेसाती कमी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान आंतराराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफने) जारी केलेल्या अहवालानुसार चालू आर्थिक वर्षात भारताचा महागाई दर 6.8 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे. तर 2024 मध्ये ते 4 टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वतीने एक अहवाल जारी करून ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. जागतिक चलनवाढीचा दर 2022 मध्ये 8.8 टक्के होता. तर यंदाच्या वर्षीत हा दर 6.6 टक्के राहणार आहे.
वाचा: अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त, काय महाग? 35 वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता
गेल्या वर्षी कच्चे तेल आणि नैसर्गिक गॅस महागाई वाढीला कारणीभूत ठरली होती. मात्र यंदा या सर्वांचे भाव अत्यंत कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे महागाईची साडेसाती सर्वसामान्य नागरिकांच्या राशीतून हटणार असल्याचं म्हटलं जात आहे. भारतीय कमोडिटी तज्ज्ञांच्या मते, यंदाच्या वर्षी कच्चे तेल, आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड जवळपास 17% कमी होईल. कच्चे तेलाचे भाव 75 डॉलर प्रति बॅरल होण्याची शक्यता आहे. सध्या हा भाव 90 डॉलर च्या जवळपास आहे.
तर 'जागतिक आर्थिक परिस्थिती' संदर्भात एक अहवाल जारी करण्यात आला असून सुमारे 84 टक्के देशांमध्ये 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढ कमी होईल असं अहवालात म्हटले आहे. 'जागतिक चलनवाढ 2022 मध्ये 8.8 टक्क्यांवरून 2023 मध्ये 6.6 टक्के आणि 2024 मध्ये 4.3 टक्क्यांवर येईल. कोरोना अगोदर ते सुमारे 3.5 टक्के होते.