नवी दिल्ली : सत्तेवर आल्यावर घेतलेल्या आर्थिक निर्णयांबाबत केंद्र सरकार मोठमोठे दावे करत आहे. परंतु, वास्तवातील चित्र मात्र काहीसे वेगळेच आहे. देशातील घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) अधारीत महागाई दर ऑगस्ट महिन्यात दुपटीने वाढला असून, तो ३.३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेसाठी हा धोक्याचा इशारा समजला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात घाऊक महागाईचा दर १.८८ टक्के राहिला आहे. हाच दर ऑगस्ट २०१६ मध्ये १.०९ टक्के होता. मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट २०१७मध्ये घाऊक महागाईचा दर ३.२४ टक्के इतका राहिला आहे. हाच दर जुलै महिन्यात १.८८ टक्के होता आणि ऑगस्ट २०१६मध्ये   १.०९ टक्के होता.


घाऊक महागाईची एकूणच आकडेवारी पाहता अर्थव्यवस्थेसाठी तो धोक्याचा इशारा मानला जात आहे. याचे परिणामही दिसू लागले असल्याचे अभ्यासकांचे म्हणने आहे.