नवी दिल्ली :  ज्या हेलिकॉप्टरला काल तामिळनाडूत कोन्नरमध्ये अपघात झाला, त्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड नव्हता, अशी माहिती सुत्रांकडून मिळतेय. सर्व्हिसिंगनंतर २६ तास तांत्रिक समस्या नव्हती. या हेलिकॉप्टरची त्री स्तरीय तपासणी झाली होती. सर्व्हिसिंगनंतर या हेलिकॉप्टरने २६ तास उड्डाण केलं होतं आणि त्यात कोणताही बिघाड नव्हता. व्हीआयपी उड्डाणाआधी त्री स्तरीय चाचणी केली जाते, व्हीआयपी जेव्हा उड्डाण करतात त्या आधी चाचणी केली जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या हेलिकॉप्टर अपघातात १३ जणांना जीव गमवावा लागला. यात लष्कर प्रमुख बिपिन रावत हे देखील प्रवास करत होते, त्यांच्यासह त्यांच्या पत्नीला देखील या अपघातात जीव गमवावा लागला. या अपघाताची सध्या चौकशी सुरु आहे. या प्रवासात वापरण्यात येणारं हेलिकॉप्टर हे रशियन बनावटीचं होतं. सर्जिकल स्ट्राईकमध्ये देखील हे हेलिकॉप्टर वापरण्यात आलं. यात एकजण जखमी अवस्थेत सापडला, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.