मुंबई : मगर ही पाण्यात आणि जमीनीवर राहाणारे सर्वात धोकादायक उभयचर प्राणी आहे. तिच्या तावडीत एकदा का कोणी सापडला तर तिच्यापासून सुटका होणे कठीण आहे. मगर ही आपल्या मोठ्या जबड्याने शिकार करते आणि तिच्या जबड्यात इतकी ताकद असते की, ती कोणत्याही मोठ्या प्राण्याचे सुद्धा लचके तोडू शकते. मगरी संबंधी मध्येप्रदेशमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये असे सांगितले जात आहे की, मगरीने एका 8 वर्षाच्या मुलाला जिवंत गिळले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यानंतर गावकऱ्यांना या मगरीला पकडले आणि तिचं पोट कापून तिच्या पोटातून मुलाला बाहेर काढायचे ठरवले, मात्र वनविभाग आणि पोलिसांनी गावकऱ्यांना समजावले आणि त्या पकडलेल्या मगरीला सोडायला सांगितले.


आता प्रश्न हा उभा राहात. की मगरीला कापल्यावर मुलगा खरंच जीवंत असेल का? किंवा मग मगरीच्या पोटात प्राणी किंवा कोणतीही व्यक्ती किती वेळ जीवंतं राहू शकते?


खरंतर हा काळ शिकाराच्या शरीराच्या आकारावर आणि ताकदीवर अवलंबून असतं. तसं पाहाता मगरीची पचनशक्ती इतकी मजबूत असते, ज्यामुळे ती 58 किलो वजनाचं भक्ष13 किलो बनवू शकते आणि एवढे वजन मगरीचे पोट भरण्यासाठी पुरेसे आहे.


मगर आपले अन्न कसे पचवते?


युटा विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ सी.जी. फारमरच्या म्हणण्यानुसार, अन्न पचवण्याच्या या रहस्यमय पद्धतीमागे मगरीच्या हार्ट वॉल्व आहे, जो मगरीच्या मेंदूद्वारे म्हणजेच न्यूरोलॉजिकल पद्धतीने नियंत्रित केला जातो. ते हृदयाला जाणारा रक्तपुरवठा बायपास करते आणि ते थेट त्याच्या पोटात जाते. यामुळे गॅस्ट्रिक अॅसिड अधिक वेगाने बाहेर पडते. जे इतर कोणत्याही जीवाच्या पोटात सोडल्या जाणार्‍या गॅस्ट्रिक ऍसिडपेक्षा दहापट जास्त आहे.


मगरी काय खातात?


मगरी हे मांसाहारी आहेत. ते फक्त मांस खातात. जंगलात ते मासे, पक्षी, बेडूक, क्रस्टेशियन, कधी कधी एकमेकांवर मगरीवर हल्ला करून त्यांना खातात. कधीकधी मगरी मासाचे तुकडे करुन आपल्या पोटात साचवून ठेवतात, तर कधी ते अख्खं गिळताता आणि नंतर अनेक दिवस हे पचवत राहातात. परंतु हे लक्ष घ्या की, मगर आपल्यासारखं चावून अन्न पचवत नाही.


मगरींना जेवण पचायला किती वेळ लागतो?


सी.जी. फारमरचे म्हणणे आहे की, मगर त्यांच्या वजनाच्या 23 टक्के वजनाची शिकार एकाच वेळी खाऊ शकतात. त्यानंतर 10-12 दिवसांत ते अन्न सडतो. हे त्याच्या शरीराच्या आकारावर आणि वजनावर अवलंबून असते.


हवामान अनुकूल असल्यास, या थंड रक्ताच्या प्राण्याच्या शरीरातून बाहेर पडणारे ऍसिड 10 ते 12 दिवसांत कोणत्याही प्राण्याला किंवा व्यक्तीला पचवते. म्हणून, जेव्हा मगर अधिक वजनदार प्राण्याची शिकार करते, त्यानंतर ते बरेच दिवस शांतपणे बसते.


मगर शिकार कशी करतात?


मगरी पाण्याच्या आतून आपली शिकार पाहत असतात. योग्य संधीची वाट पाहतात आणि आपल्या शिकारावर ताव मारतात. समजा तुम्ही नदीच्या काठावर चालत आहात आणि तेव्हा तुम्हाला नदीतून मगर दिसत नसली, तरी मगर तुम्हाला आतून पाहातच असले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, परंतु मगर ताशी 18 ते 20 किमी वेगाने जमिनीवर धावते आणि ती आपल्य भक्कम जबड्याने शिकारीच्या पायाला टार्गेट करते आणि पायाचे लचके तोडते.


मगरीच्या पोटात किती काळ जिवंतं राहू शकता?


जर तुम्हाला मगरीने पाण्याखाली ओढले तर तुम्ही आधी बुडून मराल. तुमचे शरीर थंड होताच ते तुम्हाला गिळंकृत करेल. जमिनीवर मगरीने तुमची शिकार केली असली तरी तुमची जगण्याची शक्यता नगण्य आहे. कारण तुम्ही तेथे तिच्या पोटाच्या पहिल्या चेंबरमध्ये जाताच त्याचे शक्तिशाली स्नायू तुमच्या शरीराला तोडायला लागतात. दुस-या चेंबरमधून बाहेर पडणारे शक्तिशाली ऍसिड हाडांना आणि मासांना गाळू लागतात. त्यामुळे मगरीने गिळल्यावर कोणी जिवंत असेल, अशी आशाच सोडून द्या.