मुंबई : आपण चंद्राला नेहमीच आकाशात पाहातो. त्याचा आकार कधीही एक सारखा नसतो. तो नेहमी बदलत असतो. पण आपल्याला त्याचा आकार सारखा का दिसत नाही? तो का बदलतो? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? या प्रश्नांचे उत्तर सूर्य आणि पृथ्‍वीशी जोडलेले आहे. वेळोवेळी बदलणारी परिस्थिती याला कारणीभूत आहे, पण यालाही एक शास्त्र आहे, ते काय आहे? हे जाणून घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्राचा आकार का बदलतो हे समजून घेण्यासाठी, प्रथम आपल्याला ते का चमकतो हे जाणून घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे आपण ते पाहू शकतो. वास्तविक चंद्राला स्वतःचे तेज नसते किंवा स्वत:चा प्रकाश नसतो. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो आणि त्याचे प्रतिबिंबित होऊन पृथ्वीवर पडते. सुर्य प्रकाशाच्या या परावर्तनामुळे चंद्र आपल्याला चमकताना दिसतो.


चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 30 दिवस लागतात. फिरत असताना चंद्र हळूहळू पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो. या परिक्रमादरम्यान वेगवेगळे कोन तयार होतात. या कोनामुळे सूर्याची किरणे जेवढी चंद्रावर पडतात तेवढीच तो आपल्याला पृथ्वीवरुन दिसतो.


चंद्राच्या अशा वेगवेगळ्या आणि बदलत्या आकारांना चंद्राचे टप्पे किंवा चंद्राच्या कला म्हणतात, यामुळेच कोनानुसार चंद्र वेगवेगळ्या आकारात दिसतो.


जेव्हा चंद्र त्याच्या कक्षेत पृथ्वीच्या समोर येतो तेव्हा सूर्याकडून येणारी किरणे पृथ्वीवर परावर्तित होत नाहीत आणि तो आपल्याला दिसत नाही आणि त्या रात्रीला आपण अमावस्येची रात्र म्हणतो. 


यावरुन एक गोष्ट स्पष्ट आहे की चंद्र गोल आहे आणि त्याचा आकार निश्चित आहे, परंतु सूर्याच्या किरणांच्या परावर्तनामुळे तो आपल्या अर्धा किंवा वेगवेगळा दिसतो.


जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते. जेव्हा हे घडते तेव्हा सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडत नाही, परिणामी किरण परावर्तित होत नाहीत. त्यामुळे चंद्रग्रहणाची स्थिती निर्माण होते.