मुंबई : देशभरातील अनेक इन्स्टाग्राम युझर्सचे अकाऊंट अचानक बंद होत आहेत. त्यामुळे युझर्सना इन्स्टाग्राम वापरण्यात अडचणी येत आहेत. अनेक युझर्सना ही समस्या भेड़सावतेय. या घटनेने इन्स्टाग्रामचे युझर्स वैतागले आहेत. त्यामुळे आता अनेक युझर्सना असा प्रश्न पडलाय की त्यांचे इन्स्टाग्राम नेमकं कधी सुरू होणार ? तसेच इन्स्टाग्राम अकाऊंट बंद होण्यामागचे कारण काय?.  



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक इन्स्टाग्राम युझर्सना (instagram down) अचानक अकाऊंट बंद होण्याचे मेसेज येत आहे. त्यांचे खाते सस्पेड (Instagram Suspend) झाल्याचे बोलले जात आहे. अनेकांनी या संदर्भातले स्क्रिनशॉट सोशल मीडियावर (Social media) शेअर केले आहेत. ट्विटर देखील इन्स्टाग्राम डाऊन असल्याचे ट्रेंड होत आहे. या घटनेने इन्स्टाग्राम युझर्स (instagram users) वैतागले आहेत.  



मिळालेल्या माहितीनुसार, काही इन्स्टाग्राम युझर्सना (instagram users) दुपारी 1 वाजल्यापासून खाते सस्पेड झाल्याचे मेसेज येत आहेत. अजूनही अशाप्रकारचे मेसेज युझर्सना येत' आहेत. त्यामुळे काहींना असेही वाटतेय़ की इन्स्टाग्रामला तांत्रिक समस्या भेडसावत आहे. मात्र तसे काही नसून इन्स्टाग्रामने खाते सस्पेड केले आहेत.


इन्स्टाग्राम डाऊन होण्यामागचं कारण काय?


मिळालेल्या माहितीनुसार, युजर्सना अलर्टसह सांगण्यात आले होते की त्यांच्याकडे 30 दिवस आहेत, त्यानंतर त्यांचे खाते निलंबित करण्यात येणार आहेत. असा मेसेज अनेक युझर्सना पाठवण्यात आला आहे. कम्युनिटी गाईडलाईन्सच्या नियमांचे पालन न केल्यामुळे इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड करण्यात आल्याचे बोलले जात आहे.


इंस्टाग्राम काय म्हणाले?


इंस्टाग्रामच्या या मुद्द्यावर कंपनीने ट्विट करून सांगितले की, कंपनी ही समस्या दुरुस्त करण्याचे काम करत आहे. तसेच इंस्टाग्रामच अकाऊंट का सस्पेंड होतेय याचे कारण त्यांनी सांगितले नाही आहे.



इन्स्टाग्रामच्या या गोंधळामुळे युझर्स चांगलेच वैतागले आहेत. तसेच लवकरात लवकर इन्स्टाग्राम (Instagram Account) सुरु व्हावे अशी प्रार्थना करत आहेत.