Insufficient Salary For Indian city: भारतातली मुंबई, दिल्ली, बंगळूरसारखी शहर झपाट्याने बदलत आहेत. येथे मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे येतायत, मोठमोठ्या कंपन्या येतायत. दळणवळणाची साधन वाढतायत. दुसरीकडे सर्वसामान्या कुटुंबांना येथे राहणे न परवडणारे असे आहे. आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या ऑनलाइन डिस्कशनमध्ये या गंभीर बाबींवर मत मांडण्यात आलंय. मुंबई सारख्या शहरामध्ये राहणाऱ्या कुटुंबाला महिन्याला साधारण दीड लाख पगारही अपुरा पडतो.  त्यासंदर्भातील एक पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IIT खरगपूरचा माजी विद्यार्थी प्रितेश काकानीने शहरांमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीयांची झोप उडाली आहे.  मुंबई, दिल्ली किंवा बंगळुरू सारख्या महानगरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांसाठी आवश्यक खर्चाबाबत त्याने पोस्ट लिहिली आहे. मेट्रो शहरामध्ये राहणाऱ्या 4 जणांच्या कुटुंबाला त्यांचे मुलभूत जीवनमान राखायचे असेल तर वर्षाला तब्बल 20 लाख रुपये लागतात, असे काकानीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. प्रितेशची ही पोस्ट काहीजणांना आवडली तर काहीजण याला विरोध करत आहेत. 


वर्षाला 20 लाख पगार म्हणजे खूप झाला असे एखाद्याला वाटू शकेल पण काकानीने एक्सवर या पगाराचे विभाजन केले आहे. त्याने यासंदर्भातील एक्सेल शीटच शेअर केली आहे. विशेष म्हणजे  ही एक्सेल शीट  आतापर्यंत 8.3 लाखाहून अधिक जणांनी पाहिलीय. काकानीने यामध्ये पगाराचे ब्रेकडाऊन दिले आहे. त्यामध्ये वार्षिक भाडे किंवा ईएमआय 4 लाख 20 हजार रुपये आहे. तर मुलांच्या शाळेची फी 4 लाख रुपये इतकी आहे. याव्यतिरिक्त वर्षाचा खाण्यापिण्याचा अंदाजे खर्च 1 लाख 20 हजार इतका आहे. तर आशियामध्ये किंवा भारतात कोठेही सहलीसाठी, इतर खर्चांसह प्रवास खर्च दीड लाख पकडण्यात आला आहे. 


ही पोस्ट पाहता वर्षाला 20 लाख पगारही कसा अपुरा आहे, याची प्रचिती येते. तुम्ही ग्रेट आहात. किमान इतका खर्च तरी लागतो, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. 


तर काही जणांनी काकाणीच्या पोस्टला विरोध दर्शवला आहे. कुत्रे, कार अशा खर्चिक गोष्टींची गरज आहे, असे मला वाटत नाही. तुमच्याकडे घर नसेल तर तुम्ही ईएमआयवर कार खरेदी करु नका, असे एकाने म्हटले. 


यावर काकानी यानेदेखील रिप्लाय दिलाय. भारतातील प्रमुख शहरांमध्ये कारची गरज आहे. तसेच कुत्र्याचा वार्षिक खर्च 6 हजार आहे. त्याकडे दुर्लक्ष करा. घराची मालकी ही एक दीर्घ प्रक्रिया आहे, असे स्वत:च्या पोस्टचा बचाव करताना काकाणीने म्हटले. मुंबईत घर भाड्यासाठी किमान 40 हजार रुपये लागतात. अशावेळी तुम्ही 7 लाखांमध्ये सर्वकाही कसं सांभाळता? असा प्रश्न त्याने केला.