अनेक वर्षे हफ्ता भरूनही का नाकारला जातो Insurance क्लेम? जाणून घ्या कारण आणि उपाय
Insurance Claim: भविष्यातील गरजा आणि काही संकटांच्या परिस्थितीमध्ये आर्थिक पाठबळ मिळावं यासाठी अनेकजण इंश्योरंस पॉलिसी सुरु करतात.
Insurance Claim: मागील काही वर्षांमध्ये साचेबद्ध गुंतवणुकीला शह देत गुंतवणुकीचे काही असे पर्याय सर्वांपुढं उपलब्ध झाले आहेत की यामध्ये गुंतवणूक करत बऱ्याचजणांनी मोठा नफाही कमवला आहे. या गुंतवणुकीमध्ये Insurance ही एक अशी तरतूद असते जिथं अनेकदा काही वैद्यकिय किंवा तत्सम कारणांसाठी आपल्याला आर्थिक मदत मिळते. पण, प्रत्येक वेळी दावा केलं असता संपूर्ण रक्कम एका क्षणात मिळते असं नसतं. अनेकचा हा दावा रद्दही होतो. अर्थात Claim नाकारला जातो. मग नेमकं काय करावं?
IRDAI कडून अशा परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी काही पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मुळात इंश्योरंस क्लेम रद्द होण्यामागची कारणं काय, हेसुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं. इंश्योरंस घेताना माहिती व्यवस्थित न भरली जाणं, पॉलिसीतील अटींची पूर्तता न करणं, किंवा सद्स्थितीला आरोग्यविषयक माहिती उघड न करणं, दिशाभूल करणारी माहिती देणं या आणि अशा काही कारणांमुळं तुमचा इंश्योरंस क्लेम नाकारला जाऊ शकतो. त्यामुळं क्लेम योग्य कारणांनी आणि योग्य अटींअंतर्गत मागणंही तितकंच महत्वाचं.
इंश्योरंस क्लेम रद्द झाल्यास काय करावं?
इंश्योरंस क्लेम रद्द झाल्यास सर्वप्रथम तुम्ही Insurance कंपनीच्या ग्रीवांस रीड्रेसल ऑफिसमध्ये जाणं अपेक्षित असतं. अधिकृत तरतुदींनुसार प्रत्येक Insurance Company कडे त्यांचा एक तक्रार निवारण अधिकारी असणं अपेक्षित असतं.
हेसुद्धा वाचा : यंदाच्या मान्सूनवरही 'अल निनो'ची वक्रदृष्टी? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं की...
IRDAI च्या नियमावलीनुसार कंपनी स्तरावर तुमच्या समस्येलं निराकरण होत नसल्यास तुमची ही तक्रार थेट IRDAI कडेच जाऊ शकते. complaints@irdai.gov.in या मेल आयडीवर तुम्ही रितसर तक्रार करू शकता. इरडानं यासाठी एक टोल फ्री क्रमांक जारी केला असून, 1800 4254 732 वर तुम्ही दूरध्वनीवरून संपर्क साधू शकता.
अगदीच शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही ही तक्रार विमा लोकपालांना देत इंन्शोरंस क्लेम करु शकता. देश पातळीवर असे अनेक विमा लोकपाल नियुक्त करण्यात आले आहेत. तुम्ही फक्त तुमच्या शहरातील विमा लोकपाल नेमके कुठून काम करतात याची माहिती insurance site वरून मिळवणं अपेक्षित असेल. विमान लोकलापालांच्या कार्यालयात गेल्यानंतर तुम्ही तिथं फॉर्म P-II आणि फॉर्म P-III भरणं अपेक्षित असेल. तक्रारीचा मेल केल्यानंतर तुम्ही त्याची प्रत (Hard Copy) लोकपालांना स्पीडपोस्टनं पाठवणंही अपेक्षित आहे. इथून पुढं या प्रक्रियेमध्ये तुमच्या तक्रारीची दखल घेतली जाते.