नवी दिल्ली : भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी रविवारी माहिती दिली की, युद्धाच्या स्थितीत जलद हल्ल्यासाठी चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर आयबीजी तैनात करण्याची त्यांची योजना आहे. यासाठी परीक्षण पूर्ण झालं आहे, परंतु कोरोना व्हायरसमुळे त्याला उशीर झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सैन्यप्रमुख म्हणाले की, "साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आयबीजीच्या रोल आउटमध्ये उशीर झाला. पण मी आश्वासन देतो की योग्य वेळेत आयबीजीला रोल आउट करु. कारण याची तयारी तर आधीच केली गेली आहे आणि प्रकोपच्या आधी व्यापक परीक्षण देखील केले गेले आहे' 


एक आयबीजी पायदळ, तोफ, वायु संरक्षण, टँक आणि सैन्य तंत्राच्या साधनांनी तयार केली गेली आहे.


मेजर जनरलच्या अध्यक्षतेत प्रत्येक आयबीजीमध्ये कमीत कमी ५ हजार सैनिक असतात. COVID-19 महामारीमुळे संरक्षण साधणं आणि त्याची खरेदीवर परिणाम झाला आहे. पण हे काही वेळेपुरतं मर्यादित आहे.


ऑक्टोबर २०१९ मध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी भारत दौऱ्याच्या आधी भारतीय लष्कराचं मुख्य रूप असलेल्या अरुणाचल प्रदेशमधील 'हिम विजय' अभ्यास केला होता. ज्यामुळे आयबीजीचं परीक्षण केलं जावू शकेल. युद्धाच्या स्थितीत डोंगराळ भागात ज्यामुळे अभ्यास करता येऊ शकेल.