Interest Rate Hike: गेल्या काही दिवसांपासून तुम्हीही व्याजदर (interest rate) वाढ असा शब्द अनेकदा ऐकत असाल. याचं कारणंही महत्त्वपुर्ण आहे कारण या व्याजदर वाढीचा (interest hike effects) परिणाम तुमच्या-आमच्यावर होणार आहे. सध्या महागाई (inflation) वाढते आहे. तुमच्या जीवनावश्यक वस्तूंपासून ते अगदी ऐशोरामच्या गोष्टींपर्यंतच्या गोष्टींमध्ये व्याजदरवाढ दिसून येते आहे. यामुळे आपल्या खिशाला जबर (impact on money) फटका बसला आहे. महागाई वाढल्यामुळे आपल्या खर्चावर त्याचा परिणाम होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण खर्च कमी करू आणि खर्च (spending) कमी केल्याने आपल्या पैशांचे वितरण होणार नाही आणि मग त्याचा परिणाम जीडीपीवर (gdp) होणार आहे. तेव्हा ही महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाला (reserve bank of india) आवश्यक ती पाऊलं उचलावी लागतात. तेव्हा आता वाढलेली महागाई पाहता सरकारनं कठोर पावलं उचलण्याचे संकेत आहे ज्यात व्याजदर वाढ अटळ असल्याचे सुत्रांचे म्हणणं आहे. 


सध्या आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक सुरू झाली आहे. त्यांच्या या मीटिंगचा एजेंडा हा महागाई (inflation control) रोखण्याचाच आहे. त्यामुळे यासाठी आरबीआयकडून कठोर पाऊलं उचलली जाणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, या वर्षीच्या जानेवारीपासून आपल्या महागाईचा दर 6 टक्क्यांहून अधिक आहे. हा दर समाधानकारक पातळीच्याही वर आहे. त्यामुळे हा दर कमी करण्याचे प्रयत्न आरबीआयचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सध्या व्याजदर 35 बीपीएस (bps) म्हणजे 0.35 टक्क्यांनी वाढणार आहे. तेव्हा याचा परिणाम तुमच्या इएमआयवर होणार असून याबद्दल तुम्हाला जास्तीत कर्जाचे हफ्ते भरावे लागणार असल्याचे संकेत आले आहे. 


रेपो रेट वाढण्याची शक्यता 


साहजिकच व्याजदर वाढीचा परिणाम सगळ्याच गोष्टींवर होणार आहे. त्यामुळे रेपो रेटही (repo rate) 0.35 टक्क्यांनी वाढ होऊन 6.25 टक्क्यांवर रेपो रेट स्थिरावू शकतो. सध्या रेपो रेट हा 5.9 टक्के आहे. आरबीयआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आरबीआयकडून कठोर पावलं उचलली जातील असे संकेत दिल होते. मे महिन्यापासून चार वेळा वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आरबीआयनं (RBI Governer Shaktikant Das) चार वेळा व्याजदर वाढ केले आहे.