ऑनलाईनचा जमाना आहे. आता आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण सहज घरी मागवू शकतो. मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, बंगळुरू या मेट्रो शहरांमध्ये होम डिलेव्हरी मागवण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेवणासोबतच किराणा आणि हेल्थकेअरच्या वस्तूही थेट ऑनलाईन मागवण्याचं प्रमाण वाढलं आहे. यातील एक इंट्रेस्टिंग फॅक्ट् म्हणजे दिल्ली, बंगळुरू, मुंबईसहीत मेट्रो शहरात  तब्बल 60 लाख अंडी मागवली गेली आहेत. 


भारत डिजिटल होतोय. आपण सहज ऑनलाईन शॉपिंग करू शकतो. यामध्ये ऑनलाईन ग्रोसरी शॉपिंग करण्याचं प्रमाण वाढतंय. अगदी एक वडापाव ते घरातील सर्व सामान भरण्यापर्यंत सर्व गोष्टी ऑनलाईन मागवता येतात. 


स्विगी इंस्टामार्ट (Swiggy Instamart) ने नुकताच एक सर्व्हे केला. जून 2021 ते जून 2022 दरम्यान तब्बल 90 लाख ग्राहकांनी ही सुविधा वापरली आणि यामधून काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 


ऑनलाईन ऑर्डर्सबाबतच्या Intresting Facts: 


  • मागील एक वर्षात 62,000 टन फळं आणि भाज्यांच्या ऑर्डर्स आल्यात. बंगळुरुधून सर्वाधिक ऑरगॅनिक वस्तूंची झाली खरेदी  

  • मागील वर्षभरात बाथरूम क्लिनर, स्क्रब पॅड, ड्रेन क्लिनर आणि इतर गोष्टींच्या तब्बल 2 लाखांपेक्षा अधिक ऑर्डर आल्यात. 

  • चहा आणि कॉफीच्या मागणीत प्रचंड वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. चहा आणि कॉफीच्या ऑर्डरमध्ये तब्बल 2000% वाढ झालेली पाहायला मिळाली 

  • सकाळच्या वेळी मुंबई आणि बंगळुरू शहरांतून दुधाला सर्वाधिक मागणी आली. यामध्ये रेग्युलर दूध, फुल क्रीम आणि टोन्ड दुधाला सर्वाधिक मागणी आहे

  • मागील दोन वर्षात ऑनलाईन अंडी मागवण्याचं प्रमाण वाढलं आहे. मेट्रो शहरातून ऑनलाईन अंडी सर्वाधिक मागवली जातात. 

  • रिपोर्टनुसार बंगळुरू आणि हैद्राबादमधून सकाळी नाश्त्यासाठी सर्वाधिक अंडी मागवली गेलीत. तर मुंबई, जयपूरमधून  डिनरसाठी सर्वाधिक अंडी मागवली गेलीत. 

  • उन्हाळयाच्या दिवसांमध्ये मेट्रो शहरांमधून आईस्क्रीमच्या मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स आल्यात. यातील बहुतांश ऑर्डर्स या रात्री दहा वाजेनंतर आलेल्या होत्या. 

  • ऑनलाईन माध्यमातून मागील बारा महिन्यांमध्ये मुंबईतून सर्वाधिक कंडोमच्या ऑर्डर्स आल्यात. या ऑर्डर्स तब्बल 570% अधिक होत्या. 


interesting facts on online sale and sale of condoms on swiggy instamart