मुंबई : आपण हे बऱ्याचदा पाहिले असेल की, आपण कुठेही बाहेर मोकळ्या ठिकाणी गेलो, तर तेथे आपल्या डोक्याभवती डासू फिरू लागतात. परंतु तुम्हाला कधी असा प्रश्व पडला आहे का की, हे तुम्हाला हे डोक्याभवतीच का फिरतात? किंवा डोक्याभवती फिरणारे डास तुम्हाला चावतात की नाही? यामागील नेमकं  कारण काय? सायन्स असे सांगते की, डोक्यावर फिरणारे सर्व डास माणसांना चावत नाहीत. मग आपल्याला नक्की कोणते डास चावतात? तर तुम्हाला डासांबद्दल काही माहिती सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे लक्षात घ्या की, डासांमध्ये नर आणि मादी दोन्ही डासांचा समावेश आहे, परंतु फक्त मादी डास मानवी रक्त शोषतात. त्यामुळे मानसाच्या डोक्यावर फिरणारे डास हे नर असतात आणि ते मानसाला चावत नाहीत.


डास डोक्यावर घिरट्या घालण्याचे कारण काय आहे?


या मागचे कारण आहे मानवी शरीरातून निघणारा कार्बन डायऑक्साइड. डासांवर केलेल्या संशोधनात असे म्हटले आहे की, मानव कार्बन डाय-ऑक्साइड वायू सोडतो आणि डास या कार्बन डायऑक्साइडकडे आकर्षित होतात. डास या कार्बन डाय ऑक्साईडच्या मदतीने तुम्हाला अगदी 10 मीटर अंतरावरून शोधू शकतात.


जर्नल ऑफ मेडिकल एंटोमोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, आतापर्यंत असे मानले जात होते की, मादी डास मनुष्याचं रक्त पितात तर, नर डास त्यांची भूक भागवण्यासाठी फुलांच्या रसावर अवलंबून असतात.


त्यामुळे लक्षात घ्या की तुम्हाला चावणारे डास हे मादी असतात, तर तुमच्या डोक्यावर फिरणारे डास हे नर असता, जे तुम्हाला चावत नाहीत


मग डास फक्त डोक्यावरतीच का फिरतात?


एका संशोधनात असेही म्हटले आहे की, मानवी शरीरातील उष्णतेमुळे डास केसांकडे जास्त आकर्षित होतात.


घाम येणे हे देखील एक कारण आहे. सायन्स एबीसीच्या अहवालानुसार, घाम येणे हे देखील डासांच्या डोक्यावर घिरट्या घालण्याचे एक प्रमुख कारण आहे. जर तुम्ही धावत आला असाल, व्यायाम करून बाहेर गेला असाल आणि कोणतेही शारीरिक श्रम केले असतील तर तुमच्या डोक्यावर खूप घाम येतो आणि केसांमुळे हा घाम बराच काळ तसाच राहतो.


या घामामध्ये एक विशेष प्रकारचे रसायन असते, ज्याला ऑक्टॅनॉल म्हणतात. डास या रसायनाकडे आकर्षित होतात, परिणामी ते डोक्यावर घिरट्या घालू लागतात.


तुम्ही घामाने भिजलेले असताना तुमच्या आजूबाजूला डासांचा थवा फिरताना दिसला तर आश्चर्यचकित होऊ नका.


नर डास रक्त पीत नाहीत मग ते माणसाकडे का जातात?


जर्नल ऑफ मेडिकल एंटोमोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे म्हटले आहे की, नर डास माणसाला चावत नाहीत, परंतु तरीही ते माणसाकडे जातात. खरेतर मादी डास त्यांना माणसाचे रक्त शोषण्यासाठी त्याच्या भवती घिरट्या घालतात, त्यामुळे मग नर डास मादीच्या शोधात तेथे जाण्याची शक्यता आहे.


शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, त्याच्या अचूक माहितीसाठी यावर आणखी संशोधन करणे आवश्यक आहे.


कोणता डास कोणता रोग पसरवतो?


एडीज : चिकुनगुनिया, डेंग्यू ताप, लिम्फॅटिक फियलेरिया, रिफ्ट व्हॅली ताप, पिवळा ताप (पित्त ज्वर), झिका.
अॅनोफिलीस : मलेरिया, लिम्फॅटिक फिलेरिया (आफ्रिकेत)
क्युलेक्स: जपानी एन्सेफलायटीस, लिम्फॅटिक फिलेरियासिस, वेस्ट नाईल ताप