जैसलमेरमध्ये आंतरराष्ट्रीय स्काऊट मास्टर स्पर्धा
भारतात अशा स्पर्धेचे आयोजन प्रथमच होत असल्याने देशवासियांना याबद्दल उत्सुकता आहे.
नवी दिल्ली : जैसलमेरमध्ये आंतरराष्ट्रीय युद्धाभ्यासाचं आयोजन म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्काऊट मास्टर स्पर्धेचं आयोजन इथे करण्यात आले आहे. २४ जुलै ते १७ ऑगस्ट या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. ८ देशांच्या लष्कराच्या चिलखती विभागाचे संघ यात सहभागी होतील. अशा प्रकारच्या स्पर्धेची सुरूवात रशियात करण्यात आली. ती आता भारतात होत आहे.रशियाचा संघही यात सहभागी होणार आहे.
तत्पूर्वी रशियासह सहभागी संघांच्या लष्करी आणि राजनैतिक पथकाने पाहणी करण्यासाठी जैसलमेरला भेट दिली. या पथकाला पोखरण इथे रंगणाऱ्या या स्पर्धेच्या तयारीची माहिती देण्यात आली. पथकाने या तयारीबाबत समाधान व्यक्त केले आहे. लष्करी सज्जता, प्रशिक्षण, सांघिक भावना, एकमेकांशी समन्वय अशा विविध घटकांचा स्पर्धेत वेध घेतला जाणार आहे. भारतात अशा स्पर्धेचे आयोजन प्रथमच होत असल्याने देशवासियांना याबद्दल उत्सुकता आहे.