मुंबई : कृषी कायद्याविरोधात दिल्लीत 100 दिवसांपासून शेतकरी आंदोलन (Farmer's Protest) सुरु आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी (International Women's Day) सोमवारी दिल्ली, सिंघु, टिकरी आणि गाझीपूरच्या सीमेवरील शेतकरी आंदोलन मंचावर केवळ महिलाच (Women) दिसणार आहे. त्याच शेतकरी आंदोलनच्या (Farmer's Protest) नेतृत्व करणार आहेत. या विशेष प्रसंगी महिला शेतकरी, विद्यार्थी आणि कामगार मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होणार आहेत. महिला दिनानिमित्त सर्व आंदोलन ठिकाणी केवळ महिला शेतकरी सर्वच क्षेत्राची कमान संभाळताना त्या त्यांच्या संघर्षाची गोष्ट सांगतील. 


महिला शेतकर्‍यांना नेतृत्वाची जबाबदारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाच्या कृषी क्षेत्रात महिलांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे आयोजकांनी सांगितले. त्यामुळे या विशेष दिवशी महिला शेतकर्‍यांना मंचाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी देण्याची योजना आखण्यात आली. सोमवारी दिल्लीच्या सीमेवर हजारो महिला शेतकरी, विशेषत: पंजाब आणि हरियाणा येथून येणाऱ्या महिला शेतकरी आपले सामर्थ्य दाखवतील, असे शेतकरी नेते यांनी सांगितले. हा दिवस महिला शेतकरी, कामगार आणि मुली विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे समर्पित असेल.


दुसरीकडे, ज्येष्ठ शेतकरी नेते आणि संयुक्त किसान मोर्चाच्या (एसकेएम) सदस्या कविता कुरुगंती यांनी सांगितले की, महिला दिन साजरा करण्यासाठी दिवसभर महिलांची भाषणे होतील. या दरम्यान, सिंघु सीमेवर लहान मोर्चा काढण्यात येणार आहे.


दिल्लीच्या सीमेवर महिलांची गर्दीची शक्यता


शेतकरी हिताचे नसलेले केंद्राने तीन नवीन कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी शेतकरी तीन महिन्यांहून अधिक काळ दिल्ली, सिंघु, टिकरी आणि गाझीपूरच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. या कार्यक्रमाशी संबंधित लोकांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सुमारे 15,000 महिला शेतकरी, महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते सिंघु आणि टिकरी सीमेवर आंदोलन ठिकाणी सहभागी होतील.


दहा हजार महिला येण्याचा अंदाज


शेतकरी नेते कुलवंतसिंग संधू म्हणाले, "शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या समाजात महिलांचा मोठा वाटा आहे. परंतु त्यांना हक्काचा दर्जा देण्यात आला नाही. खरं तर त्या पुरुषांपेक्षा जास्त काम करतात. या कार्यक्रमात महिला दिन कार्यक्रमासाठी भाग घेण्यासाठी पंजाब आणि हरियाणाच्या विविध भागांतील सुमारे 10,000 महिला सीमांवर येतील. त्याचवेळी क्रांतिकारक शेतकरी संघटनेचे नेते अवतारसिंह मेहमा यांनी आपल्या संघटनेच्या तयारीचा तपशील सादर केला.