Interesting GK Quiz : इंटरनेटच्या युगात कोणतीही माहिती बोटाच्या एका क्लिकवर मिळते. गुगलवर सर्चवर (Google Search) जगातील कानाकोपऱ्यातील माहितीचा खजाना आहे. पण नोकरी किंवा स्पर्धात्मक परीक्षेला मात्री तुमचं इंटरनेट ज्ञान कामाला येत नाही. यासाठी तुमचं जनरल नॉलेज (General Knowledge) आणि सध्याच्या घडामोडीचं ज्ञान असणं महत्त्वाचं असतं. हे ज्ञान मिळतं वाचनातून. वाचाल तर वाचाल ही म्हण तुम्हाला माहितच आहे. जितकं जास्त वाचण कराल तितकी तुमच्या ज्ञानात भर पडेल.  स्पर्धात्मक परीक्षेत असे काही प्रश्न असतात जिथे आपल्या ज्ञानाचा कस लागतो. म्हणून सामान्य ज्ञान असणं गरजेचं आहे. याच गोष्टींचा विचार करत आम्ही तुमच्यासाठी काही प्रश्न घेऊन आलोय. या प्रश्नांमुळे तुमच्या सामान्य ज्ञानात भर पडेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रश्न - टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवणं योग्य आहे का?
उत्तर - फ्रिजमध्ये ठेवलेले थंड टोमॅटो माणसाच्या आरोग्यास हानीकारक ठरू शकतात. त्यामुळे टोमॅटो नेहमी सामान्य तापमानात ठेवा.


प्रश्न - रस्त्यावरुन चालन्याच्या तुलनेत बर्फावर चालणं जास्त कठिण का असतं?
उत्तर - बर्फामध्ये घर्षण कमी असतं, तर रस्त्यावर जास्त असतं, त्यामुळे बर्फावर चालणं खूप कठीण आहे.


प्रश्न -  फ्रिजमध्ये ठेवलेलं थंड दूध शरीरासाठी उपयुक्त असतं का?
उत्तर - थंड दूध त्वचेसाठी आरोग्यदायी मानलं जातं. याशिवाय थंड दूध आपल्याला डिहायड्रेशनपासून वाचवते.


प्रश्न - दक्षिण आफ्रिकेच्या जंगलात कोणते शक्तीशाली प्राणी आढळतात?
उत्तर - दक्षिण आफ्रिकेत जगातील सर्वात मोठं जंगल आहे. या जंगलात सिंह, हत्ती, गेंडा, बिबट्या आणि म्हैस हे प्राणी मोठ्या प्रमाणावर आढळतात. दक्षिण आफ्रिकेतले हत्ती विशालकाय असतात. तर इथे आढळणाऱ्या म्हशींना केप म्हैस असं म्हटलं जातं. या म्हशी खूप ताकदवार असतात, वेळ पडल्यास वाघ, सिंह या सारख्या प्राण्यांनाही टक्कर देतात.


प्रश्न - जगात असा कोणता देश आहे जो कधीच कोणाचा गुलाम बनला नाही
उत्तर - वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू वेबसाईटच्या रिपोर्टनुसार जगात असे अनेक देश आहेत, जे कधीच गुलाम नव्हते. यात प्रामुख्याने नेपाळ, भूतान, थायलँड, जपान, सऊदी अरब, इरान आणि चीन या देशांचा समावेश आहे. 


प्रश्न - मनुष्याच्या शरीराचा असा कोणता भाग आहे जो जन्मानंतर येतो आणि मृत्यूआधी जातो?
उत्तर - वास्तविक मनुष्याच्या शरीरातील दात हा असा भाग आहे जो जन्मानंतर येतात आणि म्हातारपणी तुटतात.