पोस्ट ऑफिसच्या `या` योजनेत गुंतवा फक्त 7500 रुपये; Retirement पूर्वीच व्हाल करोडपती!
ही छोटीशी गुंतवणूक केल्यास निवृत्तीपूर्वीच व्हाल करोडपती
तुम्हालाही करोडपती (Millionaire) व्हायचं असेल तर आता तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. तर मग करोडपती (Millionaire) होण्यासाठी आजपासूनच गुंतवणूक (investment) करायला सुरुवात करा. मात्र यासाठी तुम्हाला जास्त गुंतवणुकीची (investment) गरज नाही, तर दर महिन्याला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये (PPF) फक्त काही रुपये गुंतवावे लागतील. ही छोटीशी गुंतवणूक करत राहिल्यास निवृत्तीपूर्वीच तुम्ही करोडपती व्हाल. (Invest 7500 Rs in PPF scheme Will retire after becoming a millionaire)
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी हा एक चांगला पर्याय आहे, ज्यामध्ये तुम्हाला खूप चांगला परतावा मिळतो. पीपीएफमध्ये (PPF) तुम्ही एका वर्षात 1.5 लाख रुपये, म्हणजेच 12,500 रुपये दरमहा गुंतवणूक (investment) करू शकता. जर तुम्हाला कोट्याधीश व्हायचे असेल तर तुम्हाला दर महिन्याला किती गुंतवणूक करावी लागेल आणि किती काळासाठी हे माहित असणे आवश्यक आहे.
PPF वर 7.1 टक्के व्याज
सध्या सरकार पीपीएफ खात्यावर (ppf account) 7.1 टक्के वार्षिक व्याज देते. यामध्ये 15 वर्षांसाठी गुंतवणूक केली जाते. त्यानुसार, महिन्यासाठी 12500 रुपयांच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 15 वर्षांनी 40,68,209 रुपये होईल. यामध्ये एकूण गुंतवणूक 22.5 लाख रुपये असून व्याज 18,18,209 रुपये आहे.
स्टेप -1
1. समजा तुमचे वय 30 वर्षे आहे आणि तुम्ही PPF मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे
2. PPF मध्ये 15 वर्षे दरमहा रु. 12500 जमा केल्यानंतर, तुमच्याकडे रु. 40,68,209 होतील.
3. आता हे पैसे न काढता 5-5 वर्षांच्या कालावधीसाठी PPFमध्ये फिरवत रहा.
4. 15 वर्षांनंतर, आणखी 5 वर्षे गुंतवणूक करत रहा. म्हणजेच 20 वर्षांनंतर ही रक्कम 66,58,288 रुपये इतकी असेल.
5. जेव्हा ते 20 वर्षे होतील तेव्हा आणखी 5 वर्षांसाठी गुंतवणूक वाढवा, म्हणजेच 25 वर्षांनी ही रक्कम 1,03,08,015 रुपये असेल.
अशा प्रकारे त्यामच्याकडे भरपूर अशी रक्कम जमा होईल. म्हणजेच जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी पीपीएफमध्ये दरमहा 12500 रुपये गुंतवले तर 25 वर्षांनी म्हणजेच वयाच्या 55 व्या वर्षी तुम्ही करोडपती व्हाल. PPF खात्याची मॅच्युरिटी 15 वर्षे आहे. जर हे खाते 15 वर्षांसाठी वाढवायचे असेल, तर हे खाते पाच पाच वर्षांसाठी वाढवता येईल.
स्टेप - 2
जर तुम्हाला PPF मध्ये 12500 रुपयांऐवजी थोडी कमी रक्कम गुंतवायची असेल, परंतु वयाच्या 55 व्या वर्षी करोडपती व्हायचे असेल तर तुम्हाला थोडी आधी सुरुवात करावी लागेल.
1. समजा वयाच्या 25 व्या वर्षी तुम्ही तुमच्या PPF खात्यात दर महिन्याला 10,000 रुपये टाकायला सुरुवात केली.
2. 7.1 टक्के नुसार, 15 वर्षांनंतर तुमच्या खात्यात एकूण 32,54,567 रुपये असतील.
3. आता ते पुन्हा 5 वर्षांसाठी वाढवा, नंतर 20 वर्षांनी एकूण मूल्य 53,26,631 रुपये होईल.
4. तिच रक्कम पुन्हा 5 वर्षांसाठी वाढवा, म्हणजे 25 वर्षांनी एकूण रुपये 82,46,412 इतके होतील.
5. आणखी पाच वर्षांसाठी ही रक्कम वाढवली म्हणजे 30 वर्षांनंतर तुमच्या खात्यात एकूण 1,23,60,728 रुपये असतील.
6. म्हणजेच वयाच्या 55 व्या वर्षी तुम्ही करोडपती व्हाल.
स्टेप- 3
तुम्ही 10,000 रुपयांऐवजी केवळ 7500 रुपये दरमहा जमा केले तरीही तुम्ही वयाच्या 55 व्या वर्षी करोडपती व्हाल, परंतु तुम्हाला वयाच्या 20 व्या वर्षी गुंतवणूक सुरू करावी लागेल.
1. जर तुम्ही PPF मध्ये 7500 रुपये 7.1% व्याजाने 15 वर्षे जमा करत राहिल्यास, एकूण 24,40,926 रुपये जमा होतील.
2. 5 वर्षांनंतर, म्हणजेच 20 वर्षांनंतर ही रक्कम 39,94,973 रुपये असेल.
3. पुढील 5 वर्षांनंतर म्हणजेच 25 वर्षांनंतर, ही रक्कम 61,84,809 रुपये असेल.
4. 5 वर्षांनंतर म्हणजेच 30 वर्षांनंतर ही रक्कम 92,70,546 असेल.
5. आणखी 5 वर्षे गुंतवणूक चालू ठेवल्यास, 35 वर्षांनंतर रक्कम 1,36,18,714 रुपये होईल
6. म्हणजे, जेव्हा तुम्ही 55 वर्षांचे असाल, तेव्हा तुमच्याकडे सव्वा कोटींपेक्षा जास्त रक्कम असेल.