मुंबई : पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणजेच PPF मध्ये गुंतवणूक हा विश्वासार्ह तसेच सुरक्षित पर्याय आहे. या फंडमध्ये गुंतवणुकीतून चांगला परतावा देखील मिळतो. तसेच टॅक्सबचतीसाठीही मदत होते. या फंडमध्ये गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटीवर कोणताही टॅक्स लागत नाही. पीपीएफमध्ये वर्षाला 1.5 लाख रुपयांपर्यत गुंतवणूक करता येते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

PPF च्या गुंतवणूकीची मर्यादा वाढणार
पीपीएफमध्ये गुंतवणूकदारांना निश्चित परतावा मिळतो. तसेच इनकम टॅक्सच्या सेक्शन 80 सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणूकीवर करसूट देखील मिळते. 


अनेकदा पीपीएफची लिमिट संपल्यानंतरही गुंतवणूकदारांकडे बचतीसाठी पैसे शिल्लक असतात. त्यानंतर ते वेगळ्या पर्यायाच्या शोधात असतात.


अशावेळी गुंतवणूकदाराचे लग्न झालेले असल्यास, ते आपल्या पत्नीच्या नावे पीपीएफ अकाऊंट सुरू करून पैसे बचत करू शकतो.


पीपीएफ गुंतवणूकीवर मिळतात फायदे


एक्सपर्टच्या मते, आपल्या पत्नीचे पीपीएफ अकाऊंट सुरू केल्याने पीपीएफ बचतीची मर्यादा दुप्पटीने वाढते. स्वतःच्या खात्यात 1.5 लाख आणि पत्नीच्या खात्यात 1.5 लाख म्हणजेच कुंटूंबाला 3 लाख रुपयांच्या बचतीवर कर सूट मिळू शकते.


लग्न झालेल्या जोडप्यांसाठी ट्रिक


पती पत्नी दोघांचे पीपीएफ अकाऊंट योग्य मॅच्युरिटीमध्ये आल्यानंतर दोन्ही अकाऊंटमधील व्याजाचा फायदा कुटूंबाला होऊ शकतो. पीपीएफ अकाऊंट गुंतवणूकीत जोखीम न घेऊ इच्छिनाऱ्यांसाठी चांगला पर्याय ठरते. सध्या पीपीएफ अकाऊंट वर 7.1 टक्के व्याज मिळत आहे. (All about PPF account opening, closing, transfer, interest)