नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिंदमबरम यांच्या मुलाची कार्ती चिदमबरम यांची ५४ कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे... कार्ती यांची नवी दिल्ली, तामिळनाडूतील कोडाईकनाल, उटी इथले बंगले तसंच परदेशातील अर्थात ब्रिटनमधील कॉटेज, घर आणि स्पेन इथलं टेनिस क्लबची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरनुसार ईडीने ही कारवाई केलीय. तसंच अॅडव्हांटेज कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने बॅकेंतील ९० लाख रुपयांची ठेव रक्कम देखील जप्त केली आहे


कार्ति यांची जप्त करण्यात आलेली एकूण संपत्ती ५४ करोड रुपयांची आहे. 



उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयानं गेल्या २८ सप्टेंबर रोजी आयएनएक्स मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिंदबरम यांची अटक २५ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली होती. 


पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ति चिदंबरमनं परदेश गुंतवणूक संवर्धन बोर्डाकडून कशी मंजुरी  मिळवण्याचा योजना आखली होती? याविषयी सीबीआय आणि ईडी अधिक चौकशी करत आहे. 


आयएनएक्स मीडियाला २००७ साली (पी चिदंबरम अर्थमंत्री असताना) साली एफआयपीबीकडून मंजुरी मिळवून देण्यासाठी लाच घेण्याच्या आरोपाखाली २८ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर कार्तिला जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणात ईडीनं कार्तिच्या चार्टर्ड अकाऊंटंन्ड एस भास्कररमन यालाही अटक केली होती... त्यानंतर त्यालाही जामीन मिळाला.