मुंबई : आयफोन हा जगातील सर्वोत्तम फोन मानला जातो. त्याची वैशिष्ट्ये देखील खूप चांगली आहेत. तसेच हा फोन जगातील सर्वात सेफ फोन मानला जातो, पण एका व्यक्तीसाठी त्याचा आयफोन अतिशय धोकादायक आणि प्राणघातक ठरला आहे. हा व्यक्ती त्याचा आयफोन चालवत असताना अचानक त्याचा स्फोट झाला, ज्यामुळे या अपघातात व्यक्तीच्या डोळ्यांना जखम झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्यक्तीची दृष्टीही जाऊ शकते. कृपया सांगा की, ही घटना ब्राझीलची आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुटुंबीयांनी या व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात नेले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु प्रकृती ठीक नाहीय, त्याचे कुटुंबीय चांगल्या नेत्ररोग तज्ञाचा शोधात असल्याचे सांगण्यात येतं आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, लिएंड्रो ब्रासिल सिल्वा नावाच्या 28 वर्षीय व्यक्तीने 3 महिन्यांपूर्वी आयफोन 8 खरेदी केला होता. घटनेबाबत त्या व्यक्तीच्या बहिणीने सांगितले की, त्या दिवशी कुटुंबातील सदस्य आईसोबत जेवणासाठी जमले होते. सर्वजण दिवाणखान्यात होते. लिएंड्रो किचनमध्ये होता आणि त्याचा फोन चालू करत होता. तेवढ्यात अचानक मोठा आवाज आला आणि तो ओरडू लागला की, माझे डोळे गेले आहेत.  तो आवाज ऐकून सगळेच घाबरले आणि स्वयंपाकघरात धावले. जेथे आम्ही त्याच्या फोन फुटल्याचं पिहिलं आहे.


कुटुंबीयांनी आधी त्याचे डोळे धुतले आणि नंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेले. लिआंद्रोच्या बहिणीने सांगितले की, वेदना खूप असल्याने डॉक्टरांनी त्याला प्रथम गुंगीचं औषध दिलं. त्याच्या डोळ्यांच्या ऑपरेशनबाबतही डॉक्टरांनी सांगितले आहे. जर काही लवकर केले नाही तर लिआँड्रोची दृष्टी देखील जाऊ शकते.