दुबई : राजस्थान रॉयल्सचा विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन या आयपीएलमध्येही सातत्य राखण्यात अपयशी ठरला. संघाचा उपकर्णधार आणि युवा फलंदाज संजू सॅमसनने आयपीएलच्या 13 व्या सत्रात वादळी सुरुवात केली. यानंतर त्याचं कौतूक पण झालं. पण त्यानंतर तो फ्लॉप ठरत आहे. त्याच्यावर आता टीकादेखील सुरू झाली. संजू सॅमसनने पहिले दोन सामने वगळता कोणताही मोठा डाव खेळला नाही. संघाला देखील तो जिंकवू शकला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सॅमसनने आयपीएल 2020 मध्ये सुरुवात चांगली केली. त्याने प्रथम चेन्नई सुपर किंग्ज आणि नंतर किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध तुफानी अर्धशतक ठोकले. या दोन सामन्यात सॅमसनने 74 चेंडूत 159 धावा केल्या. यावेळी, त्याची सरासरी 80 च्या जवळपास होती तर स्ट्राइक रेटही 215 होते. त्याच्या दोन्ही डावांमुळे राजस्थानने दोन्ही सामने जिंकले.


मात्र यानंतर सॅमसनची बॅट शांत झाली आणि खराब शॉट खेळत तो आपली विकेट गमवत आहे. यासाठी त्याच्यावर आता टीका देखील सुरु झाली. पुढच्या नऊ सामन्यांमध्ये सॅमसनने १०२ बॉल खेळले. ज्यामध्ये फक्त 113 रन केले. यावेळी त्याची सरासरी 10 च्या जवळपास गेली, त्यानंतर स्ट्राइक रेट घसरत शंभरच्या जवळ आला.


सॅमसनने या मोसमात आतापर्यंत 11 सामने खेळले असून दोन अर्धशतकांच्या मदतीने 272 धावा केल्या. हे दोन्ही अर्धशतक त्यांच्या सुरुवातीच्या आधी दोन्ही सामन्यात आले होते, त्यानंतर त्याला मोठा डाव खेळता आला नाही. राजस्थानच्या सतत पराभवाचे मुख्य कारण म्हणजे स्वत: संजू सॅमसन आहे. जो गरजेच्या वेळी संघासाठी धावा करण्यास असक्षम ठरत आहे.