IPO Alert | गुंतवणूकीसाठी तयार रहा; पुढील आठवड्यात दोन IPO बाजारात येणार
पुढच्या आठवड्यात clean science and technology आणि GR Infraprojects या दोन कंपन्यांचा IPO येणार आहे.
मुंबई : पुढच्या आठवड्यात clean science and technology आणि GR Infraprojects या दोन कंपन्यांचा IPO येणार आहे. हे दोन्ही आयपीओ ७ जुलै रोजी येणार आहे. ९ जुलै रोजी बंद होणार आहे. दोन्ही आयपीओच्या माध्यमांतून २५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम उभारण्याचे नियोजन आहे.
GR Infraprojects चा IPO
GR Infraprojects कंपनीने लॉट साईज १७ शेअर्सची ठेवली आहे. कमीत कमी एक लॉटमध्ये पैसे गुंतवणे गरजेचे असणार आहे. प्राइज बँड ८३७ रुपयाचा असणार आहे. या हिशोबाने आयपीओसाठी कमीत कमी 14 हजाराच्या आसपासची रक्कम गुंतवावी लागणार आहे.
या आयपीओचा 50 टक्के हिस्सा संस्थात्मक Buyes (QIB)यांच्यासाठी राखीव आहे. ३५ टक्के हिस्सा रिटेल गुंतवणूकदारांसाठी असणार आहे. १५ टक्के हिस्सा गैर संस्थागत गुंतवणूकदारांसाठी रिझर्व आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी 2.25 लाख शेअर्स राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यांना प्रती शेअर 42 रुपयांची सवलत मिळणार आहे.
clean science and technology चा IPO
क्लिन सायंन्स ऍंड टेक्नॉलॉजीचा १५४६ कोटींचा आयपीओ पूर्णतः विद्यमान प्रवर्तक (Existing promoters) आणि शेअर होल्डर्सच्यावतीने ऑफर फॉर सेल (OFS)असणार आहे.
या कंपनीच्या आयपीओसाठी प्राइज बँड 880 ते 900 रुपये प्रति शेअर असणार आहे.