प्रवास रद्द झाल्यास तुम्हाला रेल्वे तिकीट रद्द करायची गरज नाही कारण...
ही सुविधा एका तिकीटासाठी तुम्ही एकदाच वापरू शकता
मुंबई : आयआरसीटीसीच्या (IRCTC) वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन तिकीट नक्कीच बुक केलं असेल... तुम्ही तिकीट बुक करता पण काहीतरी कारणानिमित्तानं तुम्हाला प्लान बदलावा लागतो... आणि अशावेळी तुमच्यासमोर प्रश्न उभा राहतो की आता या तिकीटाचं काय करायचं? हे तिकीट आत्तापर्यंत दुसऱ्या कुणाला वापरताही येत नव्हतं... त्यामुळे ते रद्दच करावं लागायचं... परंतु, आता तुमचा प्रवास तुमच्याच जवळच्या नातेवाईकाला करायचा असल्यास तुम्हाला हे तिकीट त्यांच्या नावावर ट्रान्सफर करण्याची सुविधा रेल्वेनं उपलब्ध करून दिलीय. ही सुविधा एका तिकीटासाठी तुम्ही एकदाच वापरू शकता.
तिकीट ट्रान्सफर करण्यासाठी काय कराल?
आपलं तिकीट ट्रान्सफर करण्यासाठी अगोदर आपल्या तिकीटाची प्रिन्ट काढून घ्या... आणि आपल्या जवळचं तिकीट खिडकी गाठा. ज्या व्यक्तीला तुमच्या तिकीटावर प्रवास करायचाय त्याचा ओरिजनल आयडी प्रूफ सोबत ठेवायला विसरू नका. स्टेशनवर जाऊन काऊंटर ऑफिसरला हे तिकीट ट्रान्सफर करायचं आहे, हे सांगा... ऑफिसर तुमच्याकडे व्यक्तीशी संबंधाची मागणी करेल. तुम्ही त्या व्यक्तीसोबत ब्लड रिलेशनचा प्रूफ दिला तर हे तिकीट त्या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर केलं जाईल.
रेल्वेचं तिकीट तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावावर ट्रान्सफर करू शकता. म्हणजेच तुमचे आई, वडील, भाऊ, बहिण, पती, पत्नी किंवा मुलं तुमच्या तिकीटाचा वापर करू शकतात. मात्र, तुम्ही आपल्या मित्र-मैत्रिणींना हे तिकीट ट्रान्सफर करू शकत नाही. तिकीट ट्रान्सफर करण्याचं काम तुम्हाला प्रवासापूर्वी २४ तास अगोदर पूर्ण करायचंय. तिकीट ट्रान्सफर करण्याचे अधिकार स्टेशन सुप्रिटेन्डन्टला देण्यात आले आहेत.