IRCTC वरून नाही होणार रेल्वे तिकीटाचं बुकींग? पर्याय काय, पाहूनच घ्या
IRCTC Indian Railway : रेल्वे विभाग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; थेट Ticket Booking वर होणार परिणाम... जाणून घ्या सविस्तर वृत्त
IRCTC Indian Railway : जगातील चौथ्या क्रमांकाचं रेल्वेचं जाळं अशी ओळख असणाऱ्या भारतीय रेल्वेकडून सातत्यानं प्रवाशांच्या हिताचेच निर्णय घेतले जातात. किफायतशीर दरात रेल्वेप्रवास असो किंवा मग देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात रेल्वेसेवा पोहोचवणं असो. दर दिवशी देशभरात हजारो रेल्वेंच्या माध्यमातून लाखो रेल्वे प्रवासी प्रवास करतात. या प्रवासासाठीच्या तिकीटांची जबाबदारी असते ती म्हणजे रेल्वेच्या IRCTC APP वर.
एकाच अॅपच्या माध्यमातून अगदी सहजपणे रेल्वेचं तिकीट काढता येतं. पण, आता यामध्येही एक बदल होणार आहे. डिसेंबरच्या अखेरीस रेल्वे एक नवं अॅप लाँच करण्याच्या तयारीत असून, या एका अॅपच्या माध्यमातून रेल्वे तिकीटाच्या बुकिंगपासून जेवणाची ऑर्डर, डिलिव्हरी आणि रेल्वेचा स्टेटस तपासता येणार आहे. सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळणार असल्यामुळं प्रवाशांसाठी ही अतिशय सोयीची बाब ठरणार आहे.
राहिला प्रश्न आयआरसीटीसीच्या अॅपचं काय? तर, CRIS नं तयार केलेलं हे अॅप आयआरसीटीसीच्या मूळ अॅपशी जोडलं जाणार असल्यामुळं आयआरसीटीसीसुद्धा एका नव्या रुपात प्रवाशांच्या सेवेत हजर असेल. रेल्वेच्या या सुपर अॅपमुळं फक्त तिकीट बुकिंगच नव्हे, तर प्रवाशांची इतर कैक कामंही पूर्ण होणार आहेत.
सध्याच्या घडीला विविध अॅप आणि वेबसाईटच्या माध्यमातून बुकींग, तिकीटातील बदल किंवा तिकीट रद्द करण्याची मुभा आहे. आयआरसीटीसीचं ई कॅटरिंग फूड ऑन ट्रॅक, तक्रार निवारणासाठी रेल मदत, आसनाशिवाय तिकीट आरक्षणासाठी युटीएस आणि रेल्वेच्या स्थितीविषयी जाणून घेण्यासाठी नॅशनल ट्रेन इंक्वायरी सिस्टीमचा वापर करावा लागतो. ही सर्व कामं येत्या काळाच एकाच माध्यमातून अर्थात एका अॅपच्या मदतीनं केली जाणार आहेत.
हेसुद्धा वाचा : अनेकांचे Salary Account असणाऱ्या बँकेची UPI सेवा ठप्प; 'हे' दोन दिवस पैसे सोबतच ठेवा, नाहीतर...
सध्याच्या घडीला रेल्वे प्रवासासाठी प्रवाशांकडून IRCTC च्या अॅपला प्राधान्य दिलं जातं. या अॅपचे आजमितीस 10 कोटींहून अधिक युजर्स असून, सद्यस्थितीला Reserved Train Ticket बुक करण्यासाठीचा हा एक उत्तम पर्याय आहे. दरम्यान, येत्या काळात लाँच केलं जाणारं सुपर अॅप रेल्वेच्याच अर्थार्जनात मोठी भर टाकणार आहे.
2023 या वर्षात आयआरसीटीसीच्या अॅपनं 4270 कोटी रुपये कमवले होते. ज्यामधून 1111 रुपये हा निव्वळ नफा असून, यापैकी 30 टक्के नफा रेल्वे तिकीट बुकींगच्याच माध्यमातून आला होता.