मुंबई : जर तुमची अंदमान आणि निकोबार फिरण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. कारण अंदमान आणि निकोबार फिरणं हे अधिक खर्चिक असतं हे जरी खरं असलं तरीही यावर आता IRCTC ने नवा प्लान आणला आहे. आयआरसीटीसीने आपल्या ग्राहकांना एक उत्तम प्लान आणला आहे. आयआरसीटीसीने अंदमान आणि निकोबार आइसलँड फिरण्याकरता अगदी स्वस्त दरात ट्रिप ऑफर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयआरसीटीसीने टूर पॅकेज दिलं असून त्यात 4 रात्री आणि 5 दिवसांच आहे. ही ट्रिप बुक करणाऱ्यांसाठी इंडिगोच्या इकोनॉमी क्लासची तिकिट देण्यात येणार आहे. 15 ऑगस्ट 2018 रोजी सुरू होणाऱ्या या टूरमध्ये एका व्यक्ती करता ट्रिपल शेअरिंगमध्ये जीएसटीसोबत 21,120 रुपये भरावे लागणार आहे. डबल शेअररिंगमध्ये याची किंमत 21,760 रुपये आकारले जाणार आहेत. लहान मुलांसाठी फक्त 19,815 एवढे रुपये भरावे लागणार आहे. 


कोलकाताकडून सुरू होणाऱ्या या टूर पॅकेजमध्ये फ्लाइटच्या डिपार्चर वेळ 7.35 वेळ असून पोर्ट ब्लेअर 9.50 वाजता पोहोचणार आहे. रिटर्न फ्लाइटचा डिपार्चर वेळ ही 10 वाजून 20 मिनिटांनी असणार आहे. कोलकाता 12.35 वाजता पोहोचणार आहे. IRCTC चे टूर पॅकेजमध्ये डबल शेअरिंग असून बेसिसवर एसी रूम असणार आहे. एंट्री तिकिट, फेरी तिकिट आणि फॉरेस्ट भागात जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. 


या पॅकेजमध्ये एक ते चार वर्षापर्यंतचा मुलगा कॉम्पलीमेंटरी असणार आहे. आई - वडिल हॉटेलमध्ये अकॉमडेशन शेअर करू शकतात. मात्र दोन वर्षाच्यावर असणाऱ्या मुलांना विमानाचं तिकिट घेणं आवश्यक आहे.